आज दिनांक ०३ सप्टेंबरला चिमुकल्यांसाठी तान्हा पोळ्यानिमित्त बैल सजावट स्पर्धेचे आयोजन विजय चोरडिया यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आले. वणी येथे तान्हा पोळ्यानिमित्त पोस्ट कॉलनी हनुमान मंदिर येथे सायंकाळी ०४:०० वाजता भव्य तान्हा पोळा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. विजय चोरडिया यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम उपक्रम होणार आहे. या तान्हा पोळ्यानिमित्त बैल सजावट स्पर्धेत बक्षिसांची लयलूट राहणार आहे. सामाजिक कार्यकर्ते व भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य विजय चोरडिया यांच्या पुढाकारातून व स्वर्गवासी पारसमलजी चोरडिया फाऊंडेशन व जेसीबी वणीच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यात विजेत्यांना सायकल बक्षीस दिली जाणार आहे. याशिवाय लकी ड्रॉ मधून विजेत्यांना आकर्षक भेटवस्तू दिली जाणार आहे. यात क्रिकेट किट, स्कूटर इत्यादी आकर्षक वस्तूंचा समावेश आहे. या स्पर्धेत चिमुकल्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन विजय चोरडिया यांनी केले आहे.
विजय चोरडिया यांच्या वाढदिवसानिमित्त वणीत चिमुकल्यांसाठी तान्हा पोळा बैल सजावट स्पर्धेचे आयोजन
0
वणी, शुभम कडू :
Tags
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या