वर्धा शहरात स्वातंत्र्य नंतर अनेक महापुरूषांचे मोक्याच्या ठिकाणी, चौकात पुतळे बसविल्या गेले सावरकरांचे स्मारकही निर्माण झाले मात्र ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना सर्वसामान्या पर्यंत पोचवण्यासाठी त्यांची समाधी शोधून पहिली जयंती साजरी केली,त्यांच्यावर पोवाडा लिहला महाराष्ट्रसह भारताला व जगाला छत्रपती शिवरायांची खरी ओळख करून दिली शेतकरी,महिला, कामगार, गोरगरीब, लैंगिक शोषणाच्या बळी पडलेल्या महिलांना आश्रय दिला,गोरगरीबांचे मुल मुली शिकावी यासाठी जिवाचे रान करून शाळा काढल्या अशा महापुरूप असलेल्या सत्यशोधक म.ज्योतीराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीआई फुले यांचे पुतळे व स्मारक मात्र सर्व राज्य कर्ते नगरसेवक नगराध्यक्ष आमदार खासदार मंत्री हे असूनही वर्धा शहरात झाले नाही यासाठी लढा देण्यासाठी सत्यशोधक म ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीआई फुले स्मारक समितीची स्थापना करून नगर परिषद प्रशासक, आमदार खासदार मंत्री यांना निवेदन दिले त्याचा पाठपुरावा म्हणून साई नगर चौकातील ओपणफेसच्या कम्पाउन्डला लागून असलेल्या नालीच्या जवळ भिंत तयार करून त्यावर म ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीआई फुले यांचे संयुक्त म्यूरल चित्र नगर परिषदेचे मार्गदर्शनात बांधकाम विभागातर्फे प्रयत्न झाले याची माहिती स्मारक समितीच्या सदस्यांना झाली स्मारक समितीच्या सदस्यांनी त्या जागेची पाहणी केली असता महापुरुषांचे म्युरल चित्र परिसरातील घाण वाहून नेणा-या नालीच्या काढावर निर्माण करने हा या दोन्ही महापुरुषांचा अवमान आहे असे मत झाले त्वरीत नगर परिषद येथे धाव घेऊन हा अवमान थांबावा म्हणून नगर परिषद प्रशासक यांना निवेदन देण्याचे ठरले मात्र ते उपस्थित नसल्यामुळे व ग्रेड वन अधिकारी यांचे कामबंद आंदोलन सुरू असल्यामुळे नगर परिषदेचे प्रशासक यांच्या स्विय सहाय्यक यांना निवेदन देण्यात आले व याची माहिती म.ज्योतीराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीआई फुले स्मारक समितीचे समन्वयक गजेंद्र सुरकार यांनी फोन व्दारे संपर्क करून मा आमदार डॉ पंकजभाऊ भोयर यांना माहिती दिली त्यांनी त्वरीत विश्राम गृह येथे समितीचे सदस्य व नगर परिषद बांधकाम विभागाचे प्रमुख संदिप डोईजड आणि स्मारक समितीचे सदस्य यांची बैठक घेऊन हे अवमानना प्रकरण चिघणळ्याआधी सामोपचाराने तोडगा काढून ते काढण्यात येणारे म्यूरल चित्र स्थगित केले व या दोन्ही महापुरूषांचे पुतळे व स्मारक सर्वांना विश्वासात घेवून योग्य ठिकाणी निर्माण करू अशी ग्वाही म ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीआई फुले स्मारक समितीच्या सदस्यांना दिली व पुढील होणारा अनर्थ आमरांच्या समयसुचकतेने निवळला.
यावेळी निवेदन देताना व चर्चेत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव गजेंद्र सुरकार, सत्यशोधक समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ अशोक चोपडे,म फुले समता परिषदेचे विनय डहाके, डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालयाच्या संचालिका डॉ चेतना सवाई प्राचार्य डॉ मोहनिश सवाई शिक्षण बचाव समितीचे राज्य समन्वयक रमेश बिजेकर, जिल्हा अध्यक्ष मनोजकुमार देशमुख, सत्यशोधक समाजाचे कपिल थुटे, प्राचार्य जनार्दन देवतळे, संयुक्त कामगार आघाडीचे गुणवंत डकरे अण्णाभाऊ साठे पुरस्कार प्राप्त लोकसेवक नारायण आमटे डि.एड शिक्षण संघटनेच्या राज्य अध्यक्षा प्राचार्या पुद्माताई तायडे माळी समाज संघटनेच्या जिल्हाध्यक्षा रोहिणी पाटील कार्यकर्ते नरेंद्र चार्जर अविनाश गवळी भरत चौधरी आदींची उपस्थिती होती.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या