प्रतिनिधी/वर्धा (मंगेश राऊत ) :
वर्धा- भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव वर्षातही समाजामध्ये अनेक प्रश्न आ वासुन उभे आहेत . या सर्व प्रश्नांची उकल भारतीय संविधानामध्ये आहे . त्यामुळे सर्वांनी संविधान नीट समजून घेऊन संविधानिक मूल्यांच्या आधारे कृतिशील राहिले तर शोषणविरहित समाज स्थापन व्हायला काहीही वेळ लागणार नाही असे प्रतिपादन ठक्करबापा सेवा समाज समितीचे सचिव तथा वर्धा जिल्ह्याचे माजी शिक्षणाधिकारी मा लक्ष्मीनारायण सोनवणे यांनी केले.
स्थानिक नवभारत अध्यापक विद्यालय येथील सभागृहात रविवार दिनांक ३० जून २४ रोजी अश्वघोष सांस्कृतिक मंच तर्फे लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या १५० व्या जयंतीनिमित आयोजित “ चला संविधान समजून घेऊया “ या एकदिवशीय संवाद शिबिराच्या उद्घघाटन प्रसंगी अध्यक्ष पदावरून बोलत होते .या शिबिराचे उद्घघाटक म्हणून माजी प्रशासन अधिकारी न प वर्धा मा गोवर्धन टेंभुर्णे होते . तर प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध विधित्व एड अस्मिता टिपले तर मार्गार्दशक राजवैभव शोभा रामचंद्र कोल्हापूर व शितल यशोधरा पुणे ह्या होत्या . तर विशेष अतिथी म्हणून प्राचार्य सुनील गावंडे , मुख्याध्यापक भावेकर , अनिसचे राज्य प्रधान सचिव गजेंद्र सूरकार उपस्थित होते.
प्रारंभी लोकराजा राजर्षी शाहू महाराज याना अभिवादन व दीपप्रज्वलन करण्यात आले . तनु वराडे हिने संविधान उद्देशिकेचे वाचन केले .त्यानंतर प्रदीप लोखंडे यांनी “ भारताचे लोक आम्ही …” ही गज़ल सादर केली . गोवर्धन टेंभुर्णे यांनी संवाद शिबिराचे उदघाटन करीत डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याची माहिती दिली तसेच एड अस्मिता टिपले यांनी शाहू महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची माहिती दिली . त्यानंतर विविध सत्रामध्ये एक्टिविटी बेस आणि विविध टास्क देत , गाणी, खेळ घेत राजवैभव व शितल यांनी संविधान सभेतील कार्य , चर्चा ,वादप्रतिवाद , संविधानिक मूल्यांवर होत असलेला आघात , आपली भूमिका आणि संविधान संवादक म्हणून पुढे प्रस्ताविका श्रोत्यांसमोर कशी मांडणी केली पाहिजे याची सविस्तर माहिती ११ ते ५ या वेळात शिबिरार्थीना देण्यात आली. यावेळी गटचार्चही घेण्यात आल्यात. या शिबिरामध्ये चाळीस शिबिरार्थी सहभागी झाले होते .
या शिबिराचे सूत्रसंचालन निखिल सुशीला मोरेश्वर , प्रास्ताविक प्रकाश कांबळे यांनी तर आभार प्रा प्रीतेश म्हैसकर यांनी मानले . शिबिरातून काय शिकायला मिळाले ? आणि शिबिरातील काही न आवडणाऱ्या बाबी डॉ प्रिया कदम , तेजस्विनी दहाट ,सुनील ढाले , संदीप भगत , कल्पना फुसाटे ई मनोगतातून व्यक्त केल्यात . आयोजनासाठी मंगेश राऊत ,प्रविण जंगले ,प्रणोज बनकर , डॉ शैलेश कदम ,डॉ अरविंद पाटील , संघर्ष डहाके ,शुभम गोटे , जगदीश भगत ,हर्षल महाजन ,श्रीधर मून ,संबोधी जिंदे ,मैत्री जिंदे,सुनंदा कांबळे ,उषा ताई मात्रे,शुभांगी पाटिल ,द्वारकाताई ईमादवार ,अरुण भोसले , प्रशांत भगत , गजेंद्र ढोके ,विपीन वावरे ,सरिकाताई देहणकर , सुरेखा वाघ , एड ज्योति कोमलकर , रजनी लोखंडे , रंजना कोल्हे , नाना कांबळे आदींनी सहकार्य केले.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या