Type Here to Get Search Results !

घरकुल लाभार्थ्यांचे थकीत अनुदान त्वरित देणे - फाल्गुन गोहोकार

 वणी, शुभम कडू :

                            तालुक्यात रमाई, पंतप्रधान, व शबरी घरकुल योजनेचे लाभार्थी मोठ्या प्रमाणात आहेत. या योजनेअंतर्गत त्यांना घरकुल बांधण्याकरिता पहिला व दुसरा टप्पा अनुदानाचा वितरित करण्यात आला तर कुठे कुठे पहिल्या टप्प्यावरच काम थांबलेले आहे. त्यामुळे उर्वरित रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा न झाल्याने कामे पूर्णतः ठप्प आहेत. सद्यस्थितीत पावसाचे दिवस असून बांधकाम विभागामुळे या लाभार्थ्यांना उघड्यावर आपला उदरनिर्वाह करावा लागत आहे. परिणामी मोठा मानसिक त्रास लाभार्थ्यांना होत आहे.

            तसेच लाभार्थ्यांच्या नावाने पाच ब्रास रेतीची नोंद असून त्यांना फक्त २ ब्रास रेती दिली जात आहे. तसेच ज्या लाभार्थ्यांना त्यांच्या गावाजवळील डेपो वरूनच रेती देण्यात यावी जेणेकरून लाभार्थांचा खर्च वाचेल. ज्या रेती डेपो वाल्यांनी लाभार्थ्यांची फसवणूक करून पाच ब्रास च्या ऐवजी दोन ब्रास रेती दिली आहे. अश्या डेपो धारकांवर त्वरित कारवाई करावी. तसेच लाभार्थ्यांना जवळील डेपो मधून रेती द्यायचे आदेश देण्यात यावे, असे निवेदन मनसे चे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांनी
उपविभागीय अधिकारी यांना दिले.

      येत्या आठ दिवसात घरकुल योजनेचे उर्वरित अनुदान तसेच लाभार्थ्यांना जवळील डेपो वरून रेती उपलब्ध करून न दिल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या विरोधात तीव्र आंदोलन छेडेल यामध्ये कायदा सुव्यवस्था बिघडल्यास आपण स्वतः जबाबदार राहाल असा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला.

       यावेळी धिरज पिदूरकार, राकेश शंकावार रणजित बोडे, विलन बोदाडकर, आकाश काकडे, प्रविण कळसकर, योगेश काळे, सुरज काकडे, गजानन कोंडेकार, धिरज बागवा, दिलीप पेचे, गणेश खामनकर, शांताबाई काळे, गणेश करमणकर, गिता बुरडकर, संगिता चिंचोलकर, बंडू पुंड, सतिश काकडे उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad