मारेगाव/प्रतिनिधी :
स्कॉलर्स इंटरनॅशनल स्कूल मध्ये CBSE बोर्डा तर्फे पुणे विभागातील एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर संपन्न झाला. ह्या शिबिरात जिल्ह्यातून संपूर्ण CBSE School चे शिक्षक सहभाग झाले होते. शिबिराचे मार्गदर्शक श्री. अजय सातपुते व श्री. मनोज कारेमोरे होते. ह्या कार्यक्रमाला श्री. ओमप्रकाशजी चचडा व शाळेचे प्राचार्य श्री. मनु नायर उपस्थीत होते.
मार्गदर्शकानी शिक्षकाना शिकण्याचे परिणाम आणि अध्यापन शास्त्र वर क्षमता निर्माण करण्याचे मार्गदर्शन केले.ह्या शिबिरात जिल्ह्यातून संपूर्ण CBSE School चे शिक्षक मॅक्रून स्कूल, गुरुकुल स्कूल, सैनिक स्कूल ईरा स्कूल स्कॉलर्स इंटरनॅशनल स्कूल व मार्कंडेय पोतदार स्कूल सहभागी झाले होते. ह्या कार्यक्रमाला शाळेचे शिक्षकवृंद सहभागी झाले होते.हा प्रशिक्षण शिबिर यशस्वीरित्या पार पडला.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या