वणी, शुभम कडू :
नुसाबाई चोपणे विद्यालय, वणी येथे गणित अध्यापक मंडळाची सहविचार सभा दिनांक 28 जुलै रोजी संपन्न झाली. या सभेच्या अध्यक्षस्थानी गणित अध्यापक मंडळाचे माजी अध्यक्ष विनोद संगीतराव तर प्रमुख अतिथी म्हणून माजी सचिव विजय विसपुते,अनिल फटिंग, जिल्हा कार्यकारिणीच्या महिला प्रतिनिधी सौ. ममता पारखी,जिल्हा कार्यकारिणी सदस्य विनोद पवार तर विशेष अतिथी म्हणून विनोद ताजने,पुरुषोत्तम जुमडे, सुधाकर काळे ,भारत गारघाटे, रवींद्र देवाळकर,सौ. अलका साळवे, विनोद जेणेकर, संजय देवाळकर, रवि साळवे, राळेगाव तालुका संघटक सचिन ढोके, प्रकाश देवाळकर उपस्थित होते.
गणित विषय शिकवत असतांना शिक्षकांनी नावीन्यपूर्ण पद्धती,अध्यापन साहित्य यांचा वापर करून विद्यार्थ्यांच्या पातळीवर जावून, त्यांना संधी उपलब्ध करून देऊन अध्यापन करावे. शिक्षकांनी गणित विषयाची भीती विद्यार्थ्याच्या मनात निर्माण होणार नाही, तो त्यांना सोपा वाटावा या पद्धतीने अध्यापन करावे असे मत विजय विसपुते यांनी मांडले.
विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगाने तयार करण्याची जबाबदारी शिक्षकांनी स्वीकारावी व त्या संदर्भात असणाऱ्या विविध गणित परीक्षेत विद्यार्थ्यांना सहभागी करून घ्यावे असे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष विनोद संगीतराव यांनी मांडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा गणित मंडळाचे अध्यक्षअभय पारखी यांनी केले. सर्व स्तरातील विद्यार्थ्यांना विविध उपक्रम व योग्य अध्यापन पद्धतीचा वापर करून गणित विषय सुलभ करण्याची गरज आहे असे मत त्यांनी मांडले. याप्रसंगी पुरुषोत्तम जुमडे, विनोद ताजणे ,भारत गारघाटे,सौ. ममता पारखी यांनीही आपले मते मांडली.
या सभेमध्ये गणित अध्यापक मंडळाची वणी तालुका कार्यकारणीची निवड करण्यात आली. कार्यकारिणी अध्यक्षपदी नरेश बेलेकर, उपाध्यक्ष संतोष चिल्कावार,सचिव सुनील लखमापुरे, सहसचिव प्रमुणा भोयर संघटक भूपेंद्र देरकर, कोषाध्यक्ष राकेश वऱ्हाटे तर सदस्य म्हणून निलेश चवले, सचिन आयतवार, मारोती पिंपळकर, महिला प्रतिनिधी रजनी गादेवार,भाग्यश्री लांडे, सोनाली भोयर व अंकिता जाधव यांची निवड करण्यात आली.
त्याचप्रमाणे मारेगाव तालुका गणित अध्यापक मंडळाच्या अध्यक्षपदी संजय मोघे, उपाध्यक्ष विजय दुमोरे, सचिव प्रवीण नगराळे, सहसचिव सतीश गौरकार ,कोषाध्यक्ष रविशंकर रांगणकर तर सदस्य पदी नरेंद्र खोके, जगन्नाथ भोंगळे, वेले यांची निवड करण्यात आली.
या सभेला अविनाश जोगी,अरविंद नवघरे, अविनाश पारखी, सुखदेव गौरकर, सय्यद इम्रान, रविंद्र गोखरे वणी व मारेगाव या तालुक्यातील गणित शिक्षक बहुसंख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालन भूपेंद्र देरकर यांनी केले तर सुनील लखमापुरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या