Type Here to Get Search Results !

वणीत निःशुल्क द्विदिवसीय संगीत कार्यशाळा

वणी, शुभम कडू : 

                         येथील वनिता समाज व जैताई देवस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने वणीत प्रथमच निःशुल्क द्विदिवसीय संगीत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे . संगीत कार्यशाळा मंगळवारी व बुधवारी दिनांक ३० व ३१ जुलै २४ रोजी जैताई सभागृहात संपन्न होईल. संगीत कार्यशाळेची वेळ दोन्ही दिवस सकाळी ११ ते ५ राहणार असून ०१:३० ते ०२:०० विश्राम राहील. कार्यशाळेत ईटीव्ही सारेगामा विजेता निरंजन बोबडे आणि गायिका व अभिनेत्री पूजा टिकेकर सुगम संगीत, शास्त्रीय संगीत,सुर व ताल,गाणे संगीतबद्ध करणे इत्यादी संबंधी मार्गदर्शन करणार आहे. 

     तरी संगीत प्रेमींनी या कार्यशाळेचा अवश्य लाभ घ्यावा, अशी विनंती आयोजक संस्थांनी केली आहे. कार्यशाळेत स्त्री व पुरुष दोघेही भाग घेऊ शकतात.

Tags

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

IMG-20260924-WA0016