या घटनेची माहिती सामाजिक कार्यकर्ते तथा भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य विजय चोरडिया यांना त्यांचा मित्र परिवारांनी दिली, लगेच चोरडिया यांनी सोमवार २९ जुलै ला दुपारी एक वाजण्याच्या सुमारास खोब्रागडे कुटुंबियांच्या घरी भेट देऊन कुटुंबियांचे सांत्वन केले. व त्यांना आर्थिक मदत म्हणून ३१ हजार रुपये रोख रक्कम परिवारास भेट दिली. तसेच त्यांनी यापुढे कोणतीही मदत लागल्यास मदत करणार असल्याचे खोब्रागडे कुटुंबियांना सांगितले. यावेळी खोब्रागडे कुटुंबीयांचे अश्रु अनावर झाले होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष मानवी हक्क सुरक्षा परिषद राजु धावंजेवार, विश्व हिंदू परिषद संयोजक विशाल धुढबडे, सामाजिक कार्यकर्ते उमेश पोद्दार, अशोक सिंग, संदीप बेसरकर, प्रामुख्याने उपस्थित होते.
विजय चोरडिया यांनी केले खोब्रागडे कुटुंबियांचे सांत्वन
0
वणी, शुभम कडू :
इमारतीला रंगकाम करताना बंडू तुकाराम खोब्रागडे (५०) रा. रंगारी पुरा, वणी यांचा तिसऱ्या मजल्यावरून खाली पडून दुर्दैवी मृत्यू झाला होता. ते मजुरीने रंगकामाचे काम करून आपला व परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते. आपल्या कुटुंबाचे आधारवड होते. मात्र, अचानक बंडू यांचे अकस्मात निधन झाल्याने खोब्रागडे कुटूंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
Tags
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या