भारतिय कम्युनिस्ट पक्ष राज्य कौंसिलची नुकतिच नाशीक येथे बैठक संपन्न झाली.विवीध जिल्ह्यांनी राज्यभरात एकुण 16 विधानसभा मतदारसंघ लढविण्याचा प्रस्ताव विवीध जिल्हा नेत्रुत्वांनी राज्य सचिव मंडळाकडे दिला.त्या प्रस्तावावर राज्य कार्यकारणी अंतिम निर्णय घेऊन लवकरच विधानसभा निहाय यादी महाविकास आघाडीकडे देणार आहे. यामध्ये वणी व दिग्रस मतदारसंघाचा समावेश आहे. मागे भाकपने व आयटकने स्वतंत्र असे "भाजप हटाव देश बचाव" मोहीम राज्यभर राबविली होती. आयटकने तर हीच मोहीम घेऊन राज्यव्यापी यात्रा काढुन नागपुर विधानसभेवर सर्वात मोठा एक लाख कामगार कर्मचारयांचा मोर्चा काढला होता ज्याची दखल शासनाने, मिडीयाने व जनतेने प्रचंड प्रमाणात घेतली होती. त्याचा परीणाम होऊन लोकसभा निवडणुकीत भाजपा पराभूत झाली व महाविकास आघाडीचा विजय झाला.
यवतमाळ जिल्ह्यात भाकपने वणी व दिग्रस मतदारसंघ लढविण्याचा निर्धार केला आहे. वणीमध्ये सर्वपरीचित लढावु व निष्ठावंत असलेले काॅ.अनिल हेपट उमेदवार असणार आहेत. वणी विधानसभा मतदारसंघ हा भाकपचा प्रदीर्घ काळापासुन बालेकिल्ला आहे.विवीध ग्रामपंचायती भाकपच्या ताब्यात असुन बरयाच ग्रामपंचायतीमध्ये भाकपचे सदस्य निवडुन आले आहेत. लालगुडा पं.स.मध्ये भाकपचा विजय झाला आहे. उर्वरीत पं.स.जि.प.मतदारसंघात भाकपच्या उमेदवारांनी दखलपात्र मते घेतली होती.वसंत जिनींगच्या निवडणुकीत तर भाकपच्या पॅनलला तिन्ही तालुक्यातील 300 ही बुथवर मतदारांनी कमीजास्त प्रमाणात मतदान केलेले आहे, वेकोलीच्या वणी नाॅर्थ व वणी एरीयामध्ये भाकपप्रणीत आयटक युनियन सर्वात मोठी व बलाढ्य युनियन कार्यरत आहे, खाजगी कंपनीतसुद्धा आयटक युनियन काम करतेय.
बालवाडी,अंगणवाडी,आशा वर्कर,शेतकरी, शेतमजूर युनियन आयटकचे नेत्रुत्वात कार्यरत आहे. मागचे वर्षी किसान सभेचे 1000 शेतकरी, शेतमजुरांनी वणी ते नागपूर पर्यंत पैदल मार्च काढुन विधानसभेवर विराट मोर्चा काढला होता. लोकसभा निवडणुकीत तर भाकपच्या पाठींब्याने जवळपास 30 ते 40000 लिड दिलेली आहे. महाविकास आघाडीतील सर्वच घटकपक्षामध्ये गटंतटं उफाळुन येत आहे. म्हणुन आघाडीने वणी मतदारसंघ भाकपला सोडण्यात यावा, असे आवाहन जिल्हासचिव कॉ.अनिल घाटे यांनी दिली.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या