Type Here to Get Search Results !

विकास विद्यालय व कनिष्ठ महा. विद्यालय कोरा शाळेला डाॅ.रामदासजी आंबटकर यांचे निधीतून ई.लर्निग साहित्य वाटप

प्रतिनिधी/कोरा (मंगेश राऊत) : 

                          भारत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय , हिंगणघाट येथे  मा.डाॅ.रामदासजी आंबटकर आमदार ( विधान परिषद) , मा.रमेशजी धारकर, मा.सुभाषजी टाकळे, मा.राजूजी कारवटकर यांचे उपस्थित दि.25 जुलै 2024 ला झालेल्या डिजिटल पॅनल ( ई. लर्निग) साहित्य वितरण कार्यक्रमात मा. आमदार डाॅ.रामदासजी आंबटकर यांच्या खाजगी निधीतून वर्धा जिल्ह्यातील शाळांना डिजिटल पॅनल (ई लर्निग) साहित्य वितरित करण्यात आले. त्यात विकास विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,कोरा या शाळेलाही ई.लर्निग साहित्य देण्यात आले. ग्रामीण भागातील शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून शिक्षण मिळावे या उद्देशाने शाळेचे मुख्याध्यापक सुमेध भालशंकर व सहा. शिक्षक गिरीधर काचोळे यांचे स्वाधीन ई.लर्निग साहित्य देण्यात आले. सदर कार्यक्रमात विविध शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते.

     मा.डाॅ.रामदासजी आंबटकर आमदार (विधान परिषद) यांचे खाजगी निधीतून विद्यार्थ्यांच्या हिताचे डिजिटल पॅनल ई.लर्निग शै.साहित्य विकास विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,कोरा शाळेला मिळाल्यामुळे शाळेचे प्राचार्य. सुमेध भालशंकर, सहा.शिक्षक गिरीधर काचोळे, अक्षय सालवटकर, राजेंद्रकुमार कामटकर, नामदेव नवघरे,कु जयश्री नागोसे,प्रा.गजानन शेंडे ,प्रा.अमोल काकडे, प्रा.रितेश भुजाडे, प्रा.हरिहर शिंदे, धीरज पेंदाम, प्रमोद लडी,सतिश बोकडे, कु.राणी सावसाकडे, सौरभ वैरागडे , कु. समिक्षा बारस्कर, कु. राधा चौधरी आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांनी मा आमदार साहेबांचे आभार व्यक्त काले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad