लायन्स क्लब चे माजी इंटरनॅशल डायरेक्टर लायन प्रेमचंदजी बाफना यांचे हस्ते व डीस्ट्रीक्ट गव्हर्नर लायन बलवीर सींग विज यांचे उपस्थीतीत, वणी लायन्स क्लब चे अध्यक्ष लायन राजाभाऊ पाथ्रडकर यांना 'बेस्ट डिस्ट्रिक प्रेसिडेंट (3234 H1) अवॉर्ड' नागपूर येथील होटेल रिजेंट सेंट्रल डिस्ट्रिक अवॉर्ड सेमीनार 'सेवा पारितोष' कार्यकमांअतर्गत प्रदान करण्यात आला.
तसेच लायन्स क्लब वणी ला 'बेस्ट जि.एल.टी अवॉर्ड', 'बेस्ट चॉईल्डहुड प्रोजेक्ट अवॉर्ड', लायन्स क्लब वणी चा पर्मनंट ऐज्युकेशनल प्रोजेक्ट वणी लायन्स इंग्लिश मिडी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज ला विशेष अवॉर्ड देउन गौरवांन्वीत करण्यात आले.
या पुर्वी लायन्स क्लब च्या ब्रम्हपुरी येथे आयोजीत रिजन कॉन्फरंन्स मध्ये सुध्दा लायन्स क्लब वणीला 'बेस्ट प्रेसीडेंन्ट अवॉर्ड', 'ऑयकान ऑफ रिजन' व 'सिग्नीचर ऑफ अॅक्टीविटी अवॉर्ड' प्रदान करून सन्मानीत करण्यात आले होते.
लायन्स क्लब वणी व्दारा राबविल्या जाणारे विविध सामाजीक उपक्रम व सेवा कार्याची लायन्स इंटरनॅशनल नी नोंद घेउन क्लब ला पुरस्कृत केल्याबद्दल लायन्स क्लब वणी चे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या