Type Here to Get Search Results !

संविधान जिवंत ठेवण्यासाठी जागल्याची भूमिका ठेवा

प्रतिनिधी /वर्धा (मंगेश राऊत) : 
                                          वर्धा - देशाच्या संसदेमध्ये ७५ वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच काही लोकप्रतिनिधीनी साविंधानाच्या प्रति दाखवून , जय संविधान म्हणत शपथ घेतली .पण केवळ प्रति दाखवून संविधान जिवंत राहणार नाही त्यासाठी सजग राहून जिथे जिथे संविधानिक मूल्यांच्या विरोधी कृती होईल तेव्हा लोकप्रतिनिधीनी आवाज उठविला पाहिजे . तो आवाज जर उठवीला जात नसेल तर जनतेनी लोकप्रतिनिधीवर वचक ठेवत बोलण्यास भाग पाडल पाहिजे तरच संविधान जिवंत राहील त्यासाठी जागल्याची भूमिका ठेवणे गरजेचे आहे असे प्रतिपादन राज्य संविधान संवाद समितीचे राज्यसचिव राजवैभव शोभा रामचंद्र कोल्हापूर यांनी केले. 
   स्थानिक अनेकांत स्वाध्याय मंदिर येथे अश्वघोष सांस्कृतिक मंच तर्फे जागर संविधानाचा ,संकल्प कृतिशील होण्याचा या अभियानाअंतर्गत संविधान संवाद भाग सहा मध्ये ते बोलत होते . दादुराम बळीराम सवाई स्मृतिप्रीत्यर्थ शनिवार दिनांक ३० जून २०२४ रोजी आयोजित संविधान संवादाचे अध्यक्ष अनेकांत स्वाध्याय मंदिर चे संचालक अरुणभाऊ चवडे,तर प्रमुख अतिथी म्हणून लोकेश्वर सवाई , राष्ट्रवादी युवक काँग्रस युवा आघाडीचे मयुर डफळे होते.
                        प्रारंभी संविधान संवाद समितीच्या जिल्हा सचिव शितल यशोधरा पुणे यांनी “ मी संविधानाची प्रास्ताविका बोलतेय “ हा एकपात्री प्रयोग सादर केला . त्याबद्दल सीमा पाटील व कोमल वाघमारे यांनी त्यांचा सन्मान केला .त्यांनतर मयुर डफळे, लोकेश्वर सवाई , प्राचार्य डॉ मिलिंद सवाई यांनी आर्थिक योगदान दिल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते संविधान प्रत , सन्मानचिन्ह व निखिल सुशीला मोरेश्वर यांनी तयार केलेली वस्तू देत सन्मान करण्यात आला . प्रकाश कांबळे व साथीनी संविधान गीत सादर केले.
          राजवैभव यांनी ईस्ट इंडिया कंपनी आणि त्यातून इंग्रजांनी देशावर केलेले राज्य याचा आढावा घेत संविधान निर्मितीच्या प्रक्रियेची माहिती दिली .देशाचे स्वरूप सार्वभौम, समाजवादी , धर्मनिरपेक्ष , लोकशाही , गणराज्य असे असून मुलभूत हक्क , हक्काचे संरक्षण ,कायद्याचे राज्य ,सत्तेचे विकेंद्रीकरण ,लोकशाहीचे स्तंभ ई बद्दल माहिती देत समता , स्वातंत्र्य , न्याय , बंधुता यावर आधारित मूल्य व्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी संविधानाची बांधिलकी जोपासत खासदारांनी मार्गदर्शक तत्वे मुलभूत हक्कांमध्ये आणन्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची  गरजही त्यानी यावेळी व्यक्त केली . तसेच यावेळी अरुणभाऊ चवडे यानीही आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले.
                  या संविधान संवाद भाग सहा चे सूत्रसंचालन अर्चनाताई नाखले यांनी तर प्रास्ताविक प्राचार्य डॉ मिलिंद सवाई , परिचय प्रसिद्ध गायक प्रदीप लोखंडे तर आभार किंजल प्रकाश जिंदे या चिमुकलीने केले. कार्यक्रमाचे आयोजनासाठी संदीप भगत , प्रणोज बनकर , जगदीश भगत , सचिन वागदे , किशोर ढाले ,राजूभाऊ थूल , प्रविण जंगले , राजेश कोल्हे , दिनेश वाणी ,सुनील ढाले , मुकुंद नाखले , प्रा मुन्ना नाखले , किशोर ढाले , प्रकाश जिंदे , सुभाष चंदनखेडे , तनु वराडे ,एड ज्योती कोमलकर ,ई सहकार्य केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad