वणी :
एखाद्याच्या पायाला ठेच लागली तर दुसऱ्याच्या काळजात कळ उठावी, इतक्या संवेदनशील मनाची माणसं फार क्वचित पाहायला मिळतात. राजकारणात राहूनही इतकं हळवेपण जपणारं व्यक्तिमत्व म्हणून आज मनसे नेते राजू उंबरकर यांच्याकडे पाहिलं जातं. अर्ध्या रात्री कुणी मदतीसाठी हाक दिली तर त्याच्यासाठी धावून जाण्याची प्रामाणिक नियत ठेवणारा हा माणूस आज तरुणाईंच्या गळ्यातला ताईत बनला आहे. राजकारण्यांनी समाजसेवेची परिभाषा केवळ आपल्या स्वार्थापर्यंत सिमित ठेवली आहे. आपला उद्देश साध्य होताच, समाजसेवेची झूल वळचंणीला बांधून केवळ स्वतःचाच विकास करण्यात ही राजकीय माणसे मशगुल होतात. त्यामुळे कुणाला काही देण्याची दानतही या माणसांमध्ये उरत नाही. राजुभाऊ उंबरकरांचे मात्र सारे या उलट आहे. त्यांच्या दरबारात जाणारा माणूस कधीही रिकाम्या हाताने परत जात नाही. कुणाचा अपघात होवो, कुणाचे आजारपणा असो, कुण्या कुटुंबावर एखादे संकट कोसळो, अशा साऱ्यांच्या मदतीला धावून जाण्यासाठी राजूभाऊ उंबरकर सदैव तत्पर असतात. त्यामुळेच वणी विधानसभा मतदारसंघात त्यांची एक आगळी प्रतिमा तयार झाली आहे. अनेकदा विधानसभेच्या निवडणुकी लढविल्या. निकराची टक्कर दिल्यानंतरही पराभव पदरी पडला. परंतु या पराभवाने ते कधीच खचले नाही. मतदारांनी मतदान केले नाही म्हणून ते कधी मतदारांवर रुसले नाहीत. पुन्हा पुन्हा नव्याने ते फिनिक्स पक्षागत राखेतून उभे राहत गेले. माणसासाठी माणूस म्हणून धावत राहिले...!
वणी मतदार संघातील शेतकऱ्यांच्या समस्या असो, गरीब कुटुंबातील मुलीचे लग्न असो, कोणी आजारी असो, अशा साऱ्यांसाठीच मदत करण्याकरिता राजू उंबरकर अखंड धावत असतात. अशा कर्तुत्ववान व प्रखंर व्यक्तिमत्त्वाच्या नेतृत्वाला वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा.....
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या