जातनिहाय जनगणना करा, नोकऱ्या व शिक्षणातील आरक्षणाची ५०% मर्यादा संसदेने त्वरित उठवावी या मागणीसह जातनिहाय जनगणना करण्याच्या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने १८ जुलै २०२४ रोजी देशव्यापी आंदोलन करण्याचा निर्णय कम्युनिस्ट पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने घेतला आहे. यापूर्वीही भारतीय कम्युनिस्ट पक्षाने व जनसंघटनांनी या मागणीसाठी पाठपुरावा केला आहे. कम्युनिस्ट पक्षाच्या विजयवाडा येथे झालेल्या त्रैवार्षिक महाअधिवेशनातही जात निहाय जनगणना करण्यासंदर्भात चर्चा होऊन ठराव मंजूर झालेला होता. याशिवाय कम्युनिस्ट पक्षाने राज्यसभेत देखील 2017 साली जातनिहाय जनगणना करावी यासाठी खाजगी विधेयक मांडलेले होते. विविध राज्यामध्ये यासाठी जनजागृती करण्यात आली व आंदोलनेही करण्यात आली.
महाराष्ट्रात भारतीय कम्युनिस्ट पक्षाशी संलग्नित असलेल्या अखिल भारतीय दलित अधिकार आंदोलनाच्या वतीने राज्यव्यापी जातनिहाय जनगणना परिषद, छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद ) येथे घेण्यात आली. आता या देशव्यापी मोहिमेचा पुढचा टप्पा म्हणून 18 जुलै रोजी देशभर तहसील कार्यालये, जिल्हाधिकारी कार्यालये व सर्व संबंधित कार्यालयावर आंदोलनाची हाक पक्षाने दिली होती त्याच अनुषंगाने आज भाकप वणी शाखेने निदर्शने आंदोलन करून वरील मागण्याचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले.आंदोलनात विधानसभा उमेदवार कॉ.अनिल हेपट,जिल्हासचिव कॉ.अनिल घाटे यांचे नेत्रुत्वात बहुसंख्येने कार्यकर्ते सहभागी झाले.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या