वणी :
भारताचे पहले लेखक ज्यांचे साहित्य हिंदी, गुजराती, उडीया, बंगाली, तमीळ, मल्याळी या भारतीय भाषांबरोबरच रशियन, झेक, पोलिश, इंग्रजी, फ्रेंच अशा जगातील २७ भाषांमधे भाषांतर झाले आहे अशा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना स्मृतिदिनी अभिवादन करण्यात आले.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. बाळासाहेब राजूरकर यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन आले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. मोहनराव हरडे व मा. नारायणराव मांडवकर यांनी वाचकांना अण्णाभाऊ साठे यांच्या संपूर्ण जीवनाचा प्रवास थोडक्यात सांगितला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालक अनिलकुमार टोंगे, सूत्रसंचालन शुभम कडू तर उपस्थितांचे आभार प्रज्वल गोहोकार यांनी मानले.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या