Type Here to Get Search Results !

स्कॉलर्स इंटरनॅशनल स्कूल, मारेगाव येथे पहिल्यांदाच EVM मशीनव्दारे शाळा निडणुक

मारेगाव :
               येथील स्कॉलर्स इंटरनॅशनल स्कूल शाळा परंपेप्रमाणे दरवर्षी प्रमाणे यंदाही शाळा निवडणूक घेण्यात आली. महत्वाचे म्हणजे ह्या वेळी EVM मशीनव्दारे निडणुक घेण्यात आली. हि मशिन शाळेतील विद्यार्थ्यांनी काही Application वापरून बनविली आहे. हि निवडणूक शाळेसाठी Head Boy आणि Head Girl अशी घेण्यात आली. तसेच वर्गातील मॉनिटर व व्हॉईस मॉनिटर साठी सुद्धा घेण्यात आली. शाळेतीलच विद्यार्थी यांनी निवडणूक अधिकारी, शाई लावणे, नावे तपासणे, सही करणे व मशीनमध्ये क्लिक करणे अश्या पदाकरीता सहभाग घेतला. अगदी निवडणूक होतात तशीच सर्व परंपरा पार पडली.

     शाळेतील शिक्षकांनी ह्या कार्यक्रमाची रूपरेषा पाहली. प्राचार्य यांनी निवडणूक वर लक्ष केंद्रित करून मार्गदर्शन केले. ह्या निडणुकीचा निकाल दि. 15/07/2024 रोजी सकाळी जाहीर करण्यात येत आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक वृंद व कर्मचारी वृंद यांनी सहकार्य केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

📢 ताज्या बातम्यांसाठी
🟢 WhatsApp वर Join करा

Below Post Ad