वणी, शुभम कडू :
सध्या स्थितीत शाळा महाविद्यालय चालू झाले आहेत याच बरोबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनायासह अन्य कल्याणकारी योजना चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनात लागू करण्यात आल्या त्याचबरोबर शेतकर्यांना नियमित योजना व इतर दस्तावेजांच्या उपलब्धीसाठी विद्यार्थी, महिला, शेतकरी व सर्वसामान्य जनतेला गाव खेड्यातून तालुका पातळीवर येण्यासाठी दळणवळणाची व्यवस्था असणे महत्वाचे आहे.
तालुक्यातील उकणी या गावावरून अनेकसे विद्यार्थी शाळा, महाविद्यालयाकरिता वणी येथे येतात; परंतु त्यांच्या दळणवळनाकरिता आपल्या विभागाकडून कोणतीही बससेवा सुरु करण्यात किंवा सद्यस्थितीत चालू नाही. विद्यार्थी तथा नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. तरी गैरसोय टाळण्याकरिता आपल्या स्तरावरून शालेय वेळेवर दोन बस फेऱ्या चालू करण्यात याव्या जेणेकरून यांची गैरसोय टळेल. येत्या आठ दिवसात बस फेऱ्या सुरु करण्यात याव्या अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या विरोधात तीव्र आंदोलन छेडेल यामध्ये कायदा सुव्यवस्था बिघडल्यास प्रशासन जबाबदार राहील. असा ईशारा मनसे तालुका प्रमुख फाल्गुन गोहोकार यांनी दिला आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या