Type Here to Get Search Results !

लायन राजाभाऊ पाथ्रडकर यांना बेस्ट प्रेसिडेंट अवार्ड' ने सन्मानित

वणी, शुभम कडू : 

                             लायन्स क्लब वणीचे अध्यक्ष लायन राजाभाऊ पाथ्रडकर यांना दिनांक ०९ जून २०२४ रोजी, ब्रम्हपुरी येथे आयोजीत रिजन कॉन्फरन्स कार्यक्रमात लायन्स इंटरनॅशनल रिजन सेवन 'बेस्ट प्रेसिडेंट अवार्ड' मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

          या कार्यक्रमाला प्रमुख पाहूणे म्हणून लायन्स क्लब डिस्ट्रिक 3234 H1 चे डिस्ट्रिक गव्हर्नर लायन बलविरसिंग विज व रिजन चेअरपर्सन लायन रामकुमार झाडे उपस्थित होते. पाहुण्यांचे हस्ते सदर पुरस्कार देण्यात आला तसेच लायन्स क्लब वणी ला 'आयकान ऑफ रिजन' व 'सिग्नीचर ऑफ अॅक्टीविटी' हे पुरस्कार सुध्दा मिळाले व वणी लायन्स चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष तथा आमदार लायन संजिवरेड्डी बोदकुरवार यांना 'लेजंड ऑफ दि रिजन' हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

           लायन्स क्लब वणीच्या लौकीकात भर पाडणाऱ्या सदर पुरस्कारांमुळे, परिसरांतून लायन्स क्लब वणी च्या कार्याचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad