वणी, शुभम कडू :
वणी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार मा. संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी शपथविधी कार्यक्रमाचा लाईव्ह प्रसारण कार्यक्रमाचे आयोजन वणी शहरात केले होते.
देशाचे लोकप्रिय नेते, विश्वगौरव मा. नरेंद्रजी मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान पदाची शपथ घेतली त्या औचित्याने शपथविधी कार्यक्रमाचा लाईव्ह प्रसारण कार्यक्रम वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार मा. संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या नेतृत्वात टिळक चौक, वणी येथे करण्यात आले होते.
मा. नरेंद्रजी मोदी यांनी प्रधानमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर फटाके फोडून व तोंड गोड करून आनंद साजरा करण्यात आला.
वणीतील नागरिकानी शापथविधी कार्यक्रम बघण्यासाठी मोठ्या संख्येने टिळक चौक येथे गर्दी केली होती. यावेळी भाजपचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या