वणी, शुभम कडू :
शिक्षक सन्मान संघ महाराष्ट्र प्रणित शिक्षक सन्मान अभियाना अंतर्गत राष्ट्रनिर्माता शिक्षक सन्मान सोहळा 16 जून ला अमरावती येथे येथे अभियंता भवनात आयोजित केला आहे.
राज्यस्तरीय सत्कार सोहळ्यात संपूर्ण महाराष्ट्रातील 40 उत्कृष्ट शिक्षक, सामजिक , प्रशासकीय सेवेत अग्रणी लोकांचा व काही संस्थाचा राष्ट्रनिर्माता पुरस्कार 2024 देवून सन्मान करण्यात येईल. यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील युवा पत्रकार निलेश अशोकराव चौधरी यांचा राज्य स्थरिय पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.




