मारेगाव :
येथील भारतिय कम्युनिस्ट पक्ष अंतर्गत कॉ. नथ्थु पाटील किन्हेकार स्मृती सभागृहाच्या उभारणीमध्ये प्रा.धनजंय आंबटकर यांचे खाद्याला खांदा लाऊन भरीव असे सहकार्य करणारे नागपुर विद्यापिठाचे माजी कुलगुरू डॉ.भालचंद्र चोपणे यांनी सभागृहाला काल भेट दिली. भेटी अंती व्यवस्थापन समिती व पक्षाचे वतिने त्यांचा सत्कार करण्यात आला.
सत्कारप्रसंगी त्यानी पुढील कार्यास सुभेच्छा दिल्या आणी सांगीतले कि प्रशस्त अशी दुमजली वास्तु शेतकरी, कामगार, शेतमजूर आणी अन्य वंचित घटकांच्या चळवळीचे केंद्र बनेल आणी शहरातील,ग्रामीण भागातिल कोणत्याही कार्यक्रमासाठी,अन्य घटकांसाठी अल्पदरात हे सभागृह उपलब्ध राहील अशी अपेक्षा व्यक्त केली.
कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणुन माजी मुख्याध्यापक पांडुरंग किन्हेकार उपस्थित होते.प्रस्तावना प्रा.धनंजय आंबटकर यांनी केले तर संचालन व आभार रविंद्र आंबटकर यांनी केले.सभागृह कर्मचारी अमोल आंबटकर यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यास सहकार्य केले.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या