वणी/प्रतिनिधी :
आचारसंहितेच्या काळात गटविकास अधिकारी (BDO) यांनी हारमोनी मिनरल्स कंपनीला NOC दिल्याचा धक्कादायक आरोप भालर ग्रामपंचायतीने केला आहे. कंपनीला देण्यात आलेल्या नाहरकत परवानग्या रद्द करण्यात याव्यात व होत असलेले अनधिकृत बांधकाम थांबवावे, यासाठी कंपनी समोर आमरण उपोषण ग्रामपंचायत व समस्त भालर ग्रामवासी यांनी सुरू केले आहे.भालर गावालगतच मे. हारमोनी मिनरल्स कंपनीचे बांधकाम अनधिकृतरित्या सुरु आहे. ग्रामपंचायतीने कोणतीही नाहरकत परवानगी दिलेली नाही. अकृषक व बांधकाम परवानगी मिळण्यापुर्वीच कंपनीच्या वतीने मागील दोन महिन्या पासुन बांधकाम करण्यात येत आहे. संबंधीत बांधकाम अनधिकृत असल्याचे ग्रामपंचायतीने स्पष्ट केले आहे.अनधिकृत बांधकामाबाबत ग्रामपंचायतीने अनेकदा तक्रारी केल्या आहेत.
त्याप्रमाणेच भालर गावाच्या हद्दीत कंपनीची एक शाखा सुरु असुन राॅकवेल मिनरल्स असे कंपनीचे नाव असुन या कंपनीमुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रदुषणामुळे ग्रामस्थ बेजार झाले आहेत.ती ही कंपनी बंद करण्यात यावी.पुन्हा नव्याने होणाऱ्या हारमोनी कंपनीमुळे प्रदुषणात वाढ होणार असुन भविष्यात अनेक दुष्परिणामाला सामोरे जावे लागणार आहे यामुळेच ग्रामस्थ कंपनीला विरोध करत आहेत.आचारसहितेच्या काळात हारमोनी कंपनीला गट विकास अधिकारी यांनी नाहरकत प्रमाणपत्र देवून ग्रामपंचायतच्या अधिकाराचे हनन केल्याचा आरोप ग्रामपंचायत व गावकरी करत आहे. तसेच पंचायत समितीचा जाहिरनामा 16 मे ला ग्रामपंचायतीच्या नोटीस बोर्डावर प्रसिध्द करण्यात आला असुन त्याची मुदत 17 जुन पर्यंत आहे व त्यानंतर आक्षेप व सुनावणी होईल असे निवेदनात नमुद करण्यात आले आहे. तर सबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी कंपनीच्या आर्थिक व राजकीय दबावाला बळी पडत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
सदर कंपनीचे अनधिकृतपणे सुरु असलेले बांधकाम बंद करून केलेले संपूर्ण बांधकाम पाडण्यात यावे व सदर कंपनीला दिल्या गेलेल्या सर्व परवानग्या रद्द करण्यात याव्या या करिता ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच सदस्य व समस्त गावकरी मे. हारमोनी मिनरल्स या कंपनीच्या विरोधात आंदोलन करत आहेत तर समस्त गावकरी आमरण उपोषणाला बसले आहे. जर प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही तर गावकरी कंपनी व प्रशासनाच्या विरोधात न्यायालयात धाव घेईल असाही इशारा दिला आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या