Type Here to Get Search Results !

मराठा सेवा संघ चे वतीने गुणवंतांचा सत्कार

 वणी, शुभम कडू : 

                             मराठा सेवा संघ वणी, मारेगांव,  झरी यांचे संयुक्त विद्यमाने गुणवंतांचा सत्कार सोहळा वणी येथे आयोजित करण्यात आला आहे. राष्ट्रमाता जिजाऊ यांचा स्मृतीदिन (१७ जुन ) आणि राजर्षी शाहु महाराज यांचा जयंतीदिन (२६ जुन ) म्हणजेच सामाजिक न्याय दिन. या दोन्ही दिवसाचे औचित्याने वणी, मारेगांव आणि झरी तालुक्यातील गुणवंत आणि यशवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा स्थानिक कुणबी समाज सांस्कृतिक भवन येथे आयोजित आहे. दुपारी ३ वाजता आयोजित या सत्कार सोहळ्याला वेव्हबिन गोल्ड हा जागतिक प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळविणारे ऍड. दिपक चटप,चंद्रपुर हे "देश विदेशातील शिष्यवृत्तीच्या संधी" या विषयावर मार्गदर्शन करतील.

       मराठा सेवा संघ वणी चे अध्यक्ष अंबादास वागदरकर यांचे अध्यक्षतेखाली आयोजित या सोहळ्यास पोलीस उपविभागीय अधिकारी गणेश किंद्रे हे विशेष अतिथी असतील तर न.प.मुख्याधिकारी सचिन गाडे, प्रा.बाळकृष्ण राजुरकर, अनंत मांडवकर, अजय धोबे,शिरपुर चे ठाणेदार माधव शिंदे, मारेगांव चे ठाणेदार ज्ञानेश्वर सावंत,ज्योतिबा पोटे, केतन ठाकरे, भारती राजपुत, लिना पोटे आदी प्रमुख मान्यवर असतील. या सत्कार सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन संभाजी ब्रिगेड चे गणेश बोंडे, लहु जिवतोडे आणि आशिष झाडे यांनी केले आहे.

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad