Type Here to Get Search Results !

वणी विधानसभा प्रमुख संजयभाऊ देरकर यांचा लिंगटी (धानोरा) येथे सत्कार

वणी, शुभम कडू :

                                   लिंगटी धानोरा येथील शिवसेना कार्यकर्त्यांनी वणी विधानसभा प्रमुख पदी नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. विशेष म्हणजे विद्यमान भाजपा आमदार महोदयाचे गाव असताना महाविकास आघाडीला मोठ्या प्रमाणात मतदान प्राप्त करून येण्याकरिता शिवसेना कार्यकर्त्यांनी परीश्रम घेतले. याबद्दल संजयभाऊ देरकर कार्यकर्त्यांच अभिनंदन करण्यासाठी लिंगटी येथे भेट दिली असता. हा एकमेकांच्या अभिनंदन आणि शुभेच्छा कार्यक्रम घडून आला.  महाविकास आघाडी ची सत्ता यावी यासाठी लोकसभेकरीता जशी मेहनत घेतली. त्याच ताकदीने रोज संपूर्ण विधानसभा क्षेत्र पिंजून काढत आहे.

                त्यांचे सोबत लिंगटी येथे निष्ठावान शिवसैनिक पदाधिकारी संतोषभाऊ माहूरे, सतिशभाऊ आदेवार, दयाकरजी गेडाम यांचा सुध्दा सत्कार करण्यात आला. सत्कार लक्ष्मणराव काळे, जगदिशजी बद्दमवार, ब्रम्हारेड्डी येल्टीवार, पवनजी काळे व ग्रामस्थानी केला. या प्रसंगी नेताजी पारखी, विजय पानघंटीवार, संतोष सासनवार आणि शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad