प्रतिनिधी/वर्धा(मंगेश राऊत ) :
वर्धा शहरातील नामवंत बालरोग तज्ञ तथा पर्यावरण प्रेमी, जलयोद्धा मा डॉ सचिन पावडे सर यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून शनिवार दिनांक १५ जून २०२४ रोजी बुद्ध टेकडी मित्र परिवार तर्फे त्यांच्या निवासस्थानी जावून जन्मदिवसाच्या सदिच्छा देण्यात आला.
त्यांना संविधान प्रस्ताविका प्रत ,“भिवा ते बोधिसत्व " हे पुस्तक व निखील सुशीला मोरेश्वर याने कच-यातून बनविलेले वस्तू भेट देत त्यांचा सामाजिक, पर्यावरण आणि जल संवर्धन क्षेत्रातील कार्याबद्दल सन्मान करण्यात आला. तसेच त्यांच्या पुढील सामाजिक वाटचालीस सदिच्छा देण्यात आल्या.
यावेळी बुध्द टेकडीचे सक्रिय कार्यकर्ते प्रकाश कांबळे, सुनील ढाले, राजेश कोल्हे, मंगेश राऊत, निखिल जावादे, इ. कार्यकर्ते उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या