प्रतिनिधी/वर्धा( मंगेश राऊत) :
जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रांतर्गत स्थापन झालेल्या बेरोजगारांच्या सहकारी संस्थाना कंत्राट स्वरुपाची कामे देण्यात येणार आहे. यासाठी इच्छुक संस्थांनी दि.25 जुन पर्यंत विहीत नमुन्यात प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने करण्यात आले आहे. शासन निर्णयाप्रमाणे 3 लाख रुपयापर्यंतची कामे आयटीआय, आर्वी व जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्णालयामार्फत संपूर्ण जिल्ह्यातील रुग्णालयाकरीता कंत्राटी स्वरुपाची कामे यामध्ये वाहन चालक, स्वच्छता सेवक, कक्षसेवक, सुरक्षासेवक अशा कंत्राटी स्वरुपाची कामे बेरोजगारांच्या सहकारी संस्थांमार्फत करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रांमार्फत गठीत समितीस प्राप्त झालेल्या कामाचे वाटप करण्याकरीता पात्र सेवा सहकारी संस्थांची निवड करण्यात येणार आहे.
यासाठी संस्थाना कंत्राटी स्वरुपाची कामे स्विकारतेवेळी कामाच्या स्वरुपाप्रमाणे आवश्यकते प्रमाणे आवश्यक परवाने त्या संस्था सदस्यांकडे असणे आवश्यक आहे. यामध्ये गुमास्ता परवाना, मजुर परवाना, फुड ॲन्ड ड्रग्ज परवाना, सिक्युरीटी गार्ड परवाना, वाहन चालक परवाना आवश्यक आहे.
उदेपात्र संस्थांची निवड करण्यासाठी संस्था कमीत कमी 6 महिने कार्यरत असावी, संस्था नोंदणी प्रमाणपत्र प्रस्तावासोबत जोडणे आवश्यक आहे. तसेच संस्थेने आर्थिक चालू वर्षाचे अंकेक्षण अहवाल, वार्षिक लेखे परिक्षण व बॅलेन्सशिटची सत्यप्रत सोबत जोडावी. सेवा सहकारी संस्थेचे को-ऑपरेटीव्ह बँकेचे अद्यावत पासबुकची सत्यप्रत जोडावी. सदर संस्थेचे सदस्य 11 पेक्षा कमी असू नये, संस्थेने सर्व संस्था अध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष व सदस्यांची चालू असलेले नुतनीकरण केलेले सेवायोजन कार्ड सोबत जोडणे आवश्यक आहे. तसेच संस्था कार्यरत असल्याबाबत व ब्लॅकलिस्टमध्ये नसल्याबाबतचे जिल्हा निबंधक, जिल्हा उपनिबंधक व सहाय्यक उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयाकडून प्रमाणपत्र आणणे आवश्यक आहे.
ज्या संस्थांनी काम केले आहे, अशा संस्थांनी त्या कार्यालयाच्या कार्यरत प्रमुखाव्दारे आपले काम समाधानकारक असल्याबाबतचे प्रमाणपत्र सही शिक्क्यासह प्रस्तावासोबत जोडणे आवश्यक आहे. अटी व शर्ती मध्ये वेळेवर शिथीलता करण्याचे अधिकार समितीकडे राखीव ठेवण्यात आले आहे. कामाचे वाटप काम वाटप समिती मार्फत जेष्ठतायादीनुसार करण्यात येणार आहे, असे जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राने कळविले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या