इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती यांना मानाचा मुजरा...
दि. ०६ जून १६७४ ला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक सोहळा, या दिनी आज ०६ जून २०२४ ला शिवतीर्थ वणी येथे शिवस्वराज्य मंच व शिवराज्यभिषेक सोहळा समिती तर्फे छत्रपती शिवाजी महाराज शिवराज्याभिषेक सोहळा व भव्य शिवकालीन लाठी काठी आणि सत्कार समारंभ चा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला विशेष अतिथी वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार मा. संजीवरेड्डी बोदकुलवार, जय जगन्नाथ मल्टी टेस्ट क्रो. बँक चे अध्यक्ष मा. संजयजी खाडे, एकविरा महिला पतसंस्था बँक मारेगाव अध्यक्षा मा.सौ. किरणताई दरेकर, शिवराज्याभिषेक सोहळा समिती वणी अध्यक्ष मा. बंटी प्रेमकुंठावार होते.
शिवकालीन लाठी काठी चे आयोजन नुसिंह व्यायाम शाळा वणी यांनी केले तर शिवराज्याभिषेक सोहळयाचे आयोजन शिवस्वराज्य मंच वणी अध्यक्ष राहुल संजय दबडे, उपाध्यक्ष दिवाकर राठोड, सर्व सदस्यगण रोहन कुणाल ठोंबरे, नांदे,चेतन सिडाम, मंगेश भोयर, अमोल भगाडे, रोशन बुरडकर, सूरज यादव, सागर डोंगरे, योगेश दहाडकर, समीर सैय्यद, लखन वाघडकर, रीतिक वैद्य, अदित्य अबलवार, अकशय दुर्गे, सुमित बुराडकर, अदित्य केराम, दिनेश काकडे, कमलेश काकडे, मनिष काकडे यांनी केले. यावेळी वणीकर नागरिकांनी सोहळ्या पाहण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या