चंद्रपूर लोकसभा निवडणुकीचा निकाल
महाराष्ट्रातील चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर आणि भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांच्यात चुरशीची लढत होती. चुरशीच्या लढतीत प्रतिभा धानोरकर दोन लाखाहून अधिक मतांनी भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांचा पराभव केला.
चंद्रपूर मध्ये सहा विधानसभा क्षेत्राचा समावेश आहे. यामध्ये चंद्रपूर, राजुरा, बल्लारपूर, वरोरा, वणी आणि आर्णी विधानसभा क्षेत्राचा समावेश आहे. वरोरा विधानसभा क्षेत्राच्या आमदार प्रतिभा धानोरकर या महाविकास आघाडीच्या उमेदवार तर बल्लारशाह विधानसभा क्षेत्राचे आमदार जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार हे महायुतीचे उमेदवार यासह वंचित बहुजन आघाडीकडून राजेश बेले यांनीही निवडणूक लढविली होती. या निवडणुकीतील महत्वाचे मुद्दे प्रतिभाताई धानोरकर यांच्या बाजूने सहानुभूती, सुधीरभाऊ मुनगंटीवार भाजपचे दिग्गज नेते, दारु बंदीचा मुद्दा, ओबीसी मतदार खूप मोठ्या प्रमाणात होत्या.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या