प्रतिनिधी/वर्धा (मंगेश राऊत) :
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शहिद डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ अभ्यास वर्ग व चर्चासत्र आयोजित करून महत्वाच्या विषयावर व्याख्यान व चर्चा दर महिन्यातून दोन वेळा घडवून आणते यावेळी वाढलेले तापमान,घटत असलेली पाण्याची पातळी त्याबाबत लोकांमध्ये जनजागृतीचा असलेला अभाव यावर चर्चा घडवून आणण्यासाठी वर्धा वर्धन हाट झुनका भाकर केन्द्राचे सभागृहात या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते याप्रसंगी मार्गदर्शन करताना वाढत्या तापमानाला जर कमी करायचे असेल तर वृक्ष लागवडी शिवाय मानवाकडे पर्याय नाही असे मत आयोजित चर्चासत्रात वर्धा शहर शाखेचे युवा विभागाचे कार्यवाह शुभम सोळंके यांनी व्यक्त केले.
यावर्षी भारताच्या काही राज्यांत तापमानाचा पारा 50 च्या वर गेलेला होता तर वर्धेचा पारा 45 च्या वर गेलेला होता वर्तमान पत्रांची दखल घेतली तर 87 व्यक्ती उष्माघाताने मृत्यू मुखी पडले पाण्याची पातळी अती खोल गेली नदी,नाले,ओढे,धरणांनी तळ गाढला होता मनुष्या सोबतच पशू प्राणी यांची पाणी आणि चारा याबाबत मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली यावर एकच उपाय आहे तो म्हणजे मोठ्या प्रमाणात प्रत्येकाने किमान पाच झाडे लावून त्याचे संगोपन व संवर्धन करणे हि काळाची व पुढच्या पिढी साठी अत्यंत गरजेचे आहे सोबतच पावसाचा प्रत्येक थेंब न थेंब हा जमिनीत कसा मुरवला जाईल याची दक्षता सरकार सोबत प्रत्येकाने घेणे गरजेचे आहे तरच वाढते तापमानाला आपण थांबवू शकतो अन्यथा आपली मानवी संस्कृती केव्हा नष्ट होईल हे सांगता येणार नाही याचे चटके दरवर्षी वाढीव तापमाच्या रूपात आपल्याला अनुभवायला मिळते.
सोबतच या बाबत आप आपल्या पातळीवरुन वृक्षलागवडी बाबत प्रबोधन मोहीम राबविली पाहिजे असा सुर उपस्थितांच्या चर्चेतून पुढे आला यावेळी जिल्हा अध्यक्ष बाबाराव किटे, राज्य प्रधान सचिव गजेंद्र सुरकार, जिल्हा उपाध्यक्ष अनिल मुरडिव, तालूकाध्यक्ष अरूण चवडे, जिल्हा प्रधान सचिव सुनील ढाले, वैज्ञानिक जाणिवा शिक्षक प्रशिक्षण विभागाचे राज्य सहकार्यवाह प्रकाश कांबळे, अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिकेचे जिल्हा कार्यवाह राजेंद्र ढोबळे, विविध उपक्रम विभागाचे कार्यवाह निखिल जवादे, विवेक वाहिनीच्या जिल्हा कार्यवाह डॉ मंजुषा देशमुख , जिल्हा सांस्कृतिक विभागाचे कार्यवाह संजय भगत आदींनी चर्चेत सहभाग घेतला.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या