शहरातील एका चायनीज च्या दुकानकानावर काम करणाऱ्या १६ वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. सदर तरुणी ही सोमवारी दिनांक १७ जून ला चायनीजचे दुकान बंद झाल्यानंतर टिळक चौक जवळ होती. तीनही आरोपी हे तिच्याजवळ येऊन ऑटोने तुला सोडून देतो असे सांगून तिला ऑटोत बसविले. ऑटो वणी -घुग्गुस रोडवरील निर्जनस्थळी थांबवला आणि तिथे या तीनही आरोपींनी आळीपाळीने या अल्पवयीन तरुणीवर बलात्कार केला. त्यांनतर तिला परत टिळक चौक येथे सोडून दिले. या तरुणीने घडलेल्या घटनेची तक्रार दाखल पोलीस स्टेशन येथे केल्यानंतर पोलीसांनी लगेच राजूर येथील आरोपी शंकर उर्फ राकेश भोस्कर (२४), राहुल यादव (२५), शंकर यादव (२८) या तिघांना अटक केली. या तीनही आरोपींवर पोलिसांनी भादंविच्या कलम ३७६, ३६६, ५०६ नुसार गुन्हे दाखल केले आहे. या अत्याचार प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार अनिल बेहेरानी यांच्या मार्गदर्शनात एपीआय दत्ता पेंडकर करीत आहे.
सामूहिक बलात्कार! वणीतील टिळक चौकातून तरुणीचे अपहरण, अत्याचार करून सोडले चौकात
0
वणी :
Tags
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या