Type Here to Get Search Results !

ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावाल तर खबरदार - डॉ. अशोक जीवतोडे यांचा इशारा

चंद्रपूर : 

           "मराठ्यांच्या दबावाखाली येऊन ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावाल तर हे आंदोलन संपूर्ण राज्यात व विदर्भात देखील होईल. संपूर्ण ओबीसी समाज हा ओबीसी नेते लक्ष्मण हाकेच्या पाठीशी उभा आहे, याची दखल सरकारने घ्यावीच" ,असा इशारा विदर्भवादी ओबीसी नेते तथा भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. अशोक जीवतोडे यांनी दिला आहे.

                        आम्ही दिलेल्या व्याख्येप्रमाणे सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करावी. ५७ लाख नोंदीचा आधार घेत मराठा आणि कुणबी एकच आहेत, असा कायदा आणावा. हैदराबादचे गॅझेट आपल्या राज्यातही लागू करावे. सातारा संस्थानचे गॅझेट लागू करावे, मनोज जरांगे यांच्या या मागण्यांच्या विरोधात विदर्भवादी ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे यांनी, समस्त ओबीसी समाज व ओबीसी संघटना या ओबीसी आरक्षणाला धक्का लागेल, असा राज्य सरकारचा कोणताही निर्णय खपवून घेणार नाही, असा इशारा दिला. 
                            दरम्यान ओबीसी नेते लक्ष्मण हाके व प्रकाश शेंडगे यांच्या आंदोलनाला देखील डॉ. अशोक जीवतोडे यांनी पाठिंबा दिला आहे. 'सगेसोयरे'वर ओबीसींचा आक्षेप आहे, ओबीसी विरोधातील उमेदवाराला विधानसभेत त्याची जागा दाखवू, असेही डॉ. अशोक जीवतोडे म्हणाले. देवेंद्र फडणवीस व भारतीय जनता पक्ष ओबीसी समाजाच्या पाठीशी असल्याचे खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलून दाखविले. त्यामुळे त्यांच्यावर आमचा विश्वास आहे.
                राज्यसरकार ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही, असा विश्वास आहे. मात्र, जरांगेच्या आंदोलनाच्या दबावात येवून जर राज्य सरकार सगे सोयरेचा अध्यादेश काढत असेल, तर ओबीसी संघटना व समाज गप्प बसणार नाही. मोठ्या प्रमाणात राज्यात ओबीसीचे आंदोलन होईल व राज्यात बिघडणारी कायदा व सुव्यवस्थेस राज्य सरकार स्वतः जवाबदारी असेल. मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत संविधान अभ्यासून निर्णय घ्यावा. ओबीसींच्या संवैधानीक अधिकारात घुसखोरी होवू नये. दबावाच्या राजकारणाला बळी पड़ नये. वारंवार ओबीसीला गृहीत धरू नये, अन्यथा खबरदार असे डॉ. अशोक जीवतोडे म्हणाले.

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad