Type Here to Get Search Results !

लो.टि.म. विभागाच्या वतीने डाॅ. विजय वाघ (Principal Scientists CSIR-NBRI Lucknow)यांचा सत्कार

वणी : सुकवलेल्या फुलापासुन कलात्मक शुभेच्छापत्र बनविणे व इतर कलात्मक हस्तकला वस्तु बनविणे याबाबत ची कार्यशाळा डाॅ. विजय वाघ सर (Principal Scientists CSIR- NBRI Lucknow) याच्या उपस्थितीत घेण्यात आली होती. त्याच्या या कार्यशाळेचा उपयोग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे झाला, यांची कृतज्ञता म्हणुन हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन प्राचार्य प्रसाद खानझोडे सर,वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डाॅ. रविंद्र मत्ते सर , संगणक विभागप्रमुख डाॅ.पटेल पाईक सर उपस्थितीत होते. डाॅ विजय वाघ सरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना भविष्यातील नविन शैक्षणिक संधी कशा असतील व विद्यार्थ्यानी त्याला समोर कसे जावे . त्याच बरोबर संशोधनातील नविन संधी कशा मिळवायच्या या बद्दल मार्गदर्शन केले. 

   कार्यक्रमाचे  सुञसंचालन डाॅ. अजय राजुरकर सर यांनी केले, तर प्रास्तविक डाॅ. रविंद्र मत्ते सर यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्राध्यापक संघदीप उके सर , मनिष पेटकर सर, शुभम तोडकर , शीतल पिंपळशेंडे, मृणाली तराळे व बी.एस्सी भाग 1 व 2,3 चे सर्व विद्यार्थी व एम.एस्सी भाग 1 व 2 विद्यार्थी  या प्रसंगी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad