वणी, शुभम कडू :
शहरासह संपूर्ण तालुक्यात खाजगी शाळांनी शिक्षणाचे बाजारीकरण केले असून याचा फटका सवर्सामान्यांना बसत आहे. सदर शाळा चालक आपला मनमानी कारभार चालवत वाटेल तेवढ्या शुल्क आकारणी करत आहे. याची रक्कम वर्षाकाठी १५ – २० हजार रुपये आहे. तर यामध्ये गणवेशाचे ४- ५ हजार तर पाठयपुस्तकाचे ३-४ व इतर अन्य काही शुल्क आकारता एका विद्यार्थ्यांकडून वर्षाकाठी २५ ते ३० हजार रुपये पालकांकडून वसूल करण्यात येतात. तर या उलट या दर्जाचे शिक्षण व सुविधा सुद्धा या शाळात नाही. या सर्व गोष्टीची आणि वास्तव परिस्थतीची संपूर्ण माहिती गट शिक्षण अधिकाऱ्यांना व शिक्षण विभागाला माहित असून सुद्धा या कॉन्व्हेन्टवर कोणतेही कारवाई होत नाही. तर या कारवाई न होण्या मागे कॉन्व्हेन्ट चालक व शिक्षण विभागाची आथिर्क देवाण घेवाण असल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला.
शहरात असलेल्या शाळेत (कॉनवेन्ट ) मध्ये शिकणारे बहुतांश विद्यार्थी हे सर्व साधारण कुटुंबातून येणारे आहे. त्यामुळे एकाचवेळी लागणारी रक्कम पालक देण्यास असमर्थ असल्याने ते पालक हि रक्कम काही टप्प्यात भरतात. तर काहीची सद्यस्थितीत ही रक्कम भरणे शक्य नसल्याने, त्यासाठी त्यांनी काही अवधी शाळा चालकाकंडे मागत आहे. मात्र शाळा चालक आपली मगृरी कायम ठेवत त्यांच्या पाल्यांना शाळेत बसू देत नाही. तर परीक्षेपासून वंचित ठेवत आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे मोठें शैक्षणिक नुकसान होत आहे. तर शाळा चालक पालकांना अरेरावीच्या भाषेत बोलून दमदाटी करत आहे. त्यांना मानसिक त्रास देत आहे.शिक्षण हक्क कायद्यानुसार कोणत्याही विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवता येत नाही. मात्र येथील शाळा चालक आपल्या पैशाच्या कमाईसाठी या कायद्याला पायदळी तुडवत आहे. प्रसंगी शेकडो विद्यार्थी शाळेत न जाता घरी आहेत. अशी तक्रार आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात आली.
शहरातील अनेक कॉन्व्हेन्ट मध्ये असा प्रकार चालु असुन अशा अनेक तक्रारी सुध्दा मनसेकडे आल्याचे शहराध्यक्ष शिवराज पेचे यांनी सांगितले. या सर्व प्रकाराची तत्काळ चौकशी करून सर्व शाळा चालकांवर कारवाई करावी व सर्व विद्यार्थ्यांना नियमित शिक्षण देण्यास सक्तीचे आदेश द्यावे, या आशयाचे निवेदन आज गटशिक्षण अधिकाऱ्याना देण्यात आले.
हा प्रकार तात्काळ थांबवून या सर्व शाळा चालकावर येत्या ८ दिवसात कारवाई न झाल्यास या सर्व प्रकारास शिक्षण विभाग पाठबळ देत आहे असे समजून शिक्षण विभागा विरोधात या सर्व विद्यार्थ्यांना सोबत घेऊन लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल. असा इशारा या निवेदनातून देण्यात आला. यावेळी मनसे शहराध्यक्ष शिवराज पेचे, गुड्डू वैद्य, मयूर गेडाम, मयूर घाटोळे, अमोल मसेवार, रीतिक पचारे, आयान खान, सारंग चिंचोळकर, सचिन जाधव, संस्कार तेलतुंबडे, गुड्डू धोटे आदी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या