Type Here to Get Search Results !

ग्रामपंचायत सदस्यांसह ग्रामस्थांचा मनसेत प्रवेश

वणी, शुभम कडू : 

                    निवडणुकांचे पडघम वाजू लागताच अनेक राजकिय उलथापालत व्हायला सुरूवात झाली आहे.  विधानसभा मतदारसंघात नागरिकांचा मनसेकडे वाढत असलेला ओघ आगामी काळात संघटन मजबुतीचा पाया भक्कम करणारा आहे. आज तालुक्यातील पार्डी (गो.) येथील दोन ग्रामपंचायत सदस्यांसह ग्रामस्थांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत पक्ष प्रवेश केला. विविध सामाजिक उपक्रमात मनसेची असलेली आघाडी आणि पक्षनेते राजु उंबरकर यांच्या लोकप्रियतेने अनेक युवक, महिला भगिनी मनसेत दाखल होत आहेत. तालुक्यातील पार्डी(गो) येथिल असंख्य कार्यकर्ते महिला भगिनींनी काल दिनांक १८ मार्च रोजी राज ठाकरे यांच्या कार्याला प्रभावित होऊन तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या उपस्थितीत मनसेचा झेंडा खांद्यावर घेतला.  यात ग्रामपंचायत सदस्य कलावती बोरके, ग्रामपंचायत सदस्य शिला मेश्राम, सुरेखा मोहितकर, अर्चना पिंपळकर, वर्षा जुलगरी, विद्या पारखी, संगीता पारखी, अलका वैद्य, पौर्णिमा पिंपळकर, सविता मोहितकर, रजनी बोदडे, प्रभावती बोर्डे, सुनीता बोदडे आदी महिलांसह सचिन बोरडे, दिलीप मोहितकर, राजू जुळगरी, ईश्वर पाणघाटे, लीलाधर मोहितकर, जगदीश आडे, कुणाल बोर्डे, दिनेश पिंपळकर, तेजस मोहितकर, विलास पिंपळकर, अनिल बोरडे, सुनील बोरडे, गणेश मेश्राम, कुंडलिक वैद्य, वसंता वैद्य, नारायण ढेपाळे, शंकर बोर्डे, निलेश पारखी आदींचा समावेश आहे.  यावेळी सर्व कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत करत त्यांचें अभिनंदन करण्यात आले. तसेच पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

  सध्याचे गढूळ राजकारण पाहता मनसेत येण्याचा निर्णय घेतला. यापुढे आता मनसेचे कार्य जनसामान्यांपर्यंत पोहचवून पक्षाला नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी कार्य करणार असल्याच्या भावना उपस्थित महिला - पुरुषांनी व्यक्त केल्या. यावेळी तालुका उपाध्यक्ष धिरज बोबडे, गौरव बोबडे यांच्या सह असंख्य मनसेसैनिक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad