वणी : तालुक्यातील शिवणी( जहाँ) येथे दिनांक 19 मार्च 2024 रोजी मंगळवारला दुपारी 04:00 वाजताच्या सुमारास येथे डिपी ला मोठ्या प्रमाणात आग लागली. त्या वेळी आगीचा भडका उडालेला पाहून प्रहार जनशक्ती पक्षाचे वणी तालुका प्रमुख नितीन गोरे यांनी अथक परिश्रम घेऊन डिपीला लागलेली आग आटोक्यात आणली.
महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे डीपी ला लागली आग
0
महावितरणच्या चालढकल भोंगळ कारभारामुळे आगीचा भडका उडाला असा आरोप प्रहार तालुकाध्यक्ष नितीन गोरे यांनी केला आहे. महावितरण कंपनीच्या अधिकारी, कर्मचारी यांनी लवकरात लवकर वीज पुरवठा सुरळीत न केल्यास, प्रहार जनशक्ती पक्षाच्या स्टाईलने उत्तर दिल्या जाईल असा इशारा नितीन गोरे यांनी महावितरणला कंपनीला दिला आहे.
👉महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे डीपी ला लागला आग 👇
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या