कोरा परिसरातील गावालगतच्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, उसेगाव येथे विद्यार्थ्यांना पर्यावरण पूरक होळी साजरी करण्याबाबत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती युवा सहभाग विभाग मंगेश रंजना संतोष राऊत यांनी मार्गदर्शन केले.
तसेच विद्यार्थ्यांनी संकल्प पत्र भरून घेतले, त्यात त्यांना सांगण्यात आले की, पर्यावरण पूरक होळी साजरी करताना होळीला पुरणपोळी दान करा, ती पोळी जाळण्याऐवजी गरजूंना दान करा, असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून करण्यात आले. त्यासोबत रंगपंचमीला घातक रासायनिक रंगाचा वापर करू नका, प्लास्टिकच्या पिशव्याचा वापर करू नका, सुखी होळी साजरी करा, होळीसाठी झाडे तोडू नका. विविध ठिकाणी होळी दहन करण्याऐवजी एकाच ठिकाणी प्रतिकात्मक होळी साजरी करा, होळीमध्ये पुरणपोळी जाळण्याऐवजी पुरणपोळी गरजूंना द्या होळीनिमित्त अपशब्द वापरणे आणि बोंबा मारण्यापासून दूर राहा, आपल्यातील दुर्गुणांची होळी करा, त्या सोबत आपल्याला असलेल्या व्यसनांची होळी करा, होळीमध्ये प्लास्टिक आणि टायर जाडू नका असे आवाहन करताना पर्यावरणस्नेही रंगाचा वापर करा असे आवाहन करण्यात आले.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या