वरोरा तालुक्यातील भटाळा येथे शंकराचे जुने मंदिर आहे. या ठिकाणी भाविक दर्शनासाठी मोठया प्रमाणात येत असतात. त्याच यात्रेकरिता वणीतील ११ तरुण दर्शनाकरिता गेले. वणी कडे परत येताना पाटाळा येथील वर्धा नदी पात्रात अंगोळीचा मोह त्यांना आवरला नाही. अंघोळीला गेले असता पाण्याचा अंदाज न आल्याने तीन तरुण बुडाले. तेथील नागरिकांनी याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर लगेच घटनास्थळी वणी पोलीस व माजरी पोलीस पोहोचले असुन पुढील तपास सुरू आहे. वणीतील विठ्ठलवाडी परिसरातील असुन त्यांची नावे हर्षल अतिष चाफले, अनिरुध्द अतिष चाफले, संकेत पुंडलिक नगराळे आहे सदर तरुण १६ ते २२ वयोगटातील आहेत.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या