या कार्यक्रमामध्ये वक्तृत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धा तसेच एकपात्री प्रयोग, भारुड, शेतकरी आत्महत्या ही नाटीका मंजूळामाता महिला मंडळ चिखलगाव यांनी सादर केली.
या कार्यक्रमाचे पाहुणे सौ. सुषमा ताई खनगन, सौ. स्नेहलता चुंबळेने, सौ. रचना देशमुख होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ. शारदा बल्की, प्रास्ताविक सौ. विजया दहेकर श्रीमती रज्जू बाई पारखी भजन प्रमुख व सौ. प्रतिभाताई फाले तर उपस्थित्यांचे आभार सौ. बेबी ताई दानव यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सौ. शोभाताई रिंगोले तसेच इतर महिला यांनी विशेष परिश्रम घेतले.
रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांक नंदा ठाकरे, द्वितीय क्रमांक नेहा भादिकर, तृतीय क्रमांक वैशाली वातिले आणि वक्तृत्व स्पर्धेत आदर्श हायस्कूल वणी येथील मुलींनी सहभाग घेतला.
कार्यक्रमाच्या शेवटी बाबापुर येथील श्री. महादेव खुटेमाटे, श्री विजयभाऊ आसुटकर यांचा हरिपाठ संच यांच्या वतीने हरिपाठ घेण्यात आले. श्री. वैजनाथ खडसे सर ग्रामगीताचार्य यांच्या माध्यमातून वक्तृत्व स्पर्धेला मोलाचे सहकार्य लाभले.
तसेच या कार्यक्रमाला विशेष सहकार्य मारोतीराव ठेंगणे यवतमाळ जिल्हा प्रचार प्रमुख, ज्ञानेश्वर कडूकर, राजेंद्रजी कोरडे, तालुका कोषाध्यक्ष दिलीप डाखरे, तालुका सेवाधिकारी वणी प्रमोद राजुरकर, सरचिटणीस अरविंद दुर्गे, तालुका प्रचारक दत्ता देऊळकर, गुरुदेव प्रचारक आर्यन रासेकर, लक्ष्मण जुमनाके, देविदास शेटे, गजानन देवगडे, प्रकाश कुचनकर, सप्रे भाऊ, नाना लाडे, बबन जेऊळकर यांनी केले.
कार्यक्रमाची सांगता सामुदायिक प्रार्थना आणि राष्ट्रवंदना घेऊन करण्यात आली.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या