Type Here to Get Search Results !

मनसे रुग्ण सेवा केंद्राच्या अध्यक्षपदी हाजी अनिस सलाट यांची नियुक्ती

वणी, शुभम कडू : 

        वणी मतदार संघातील रुग्णांना मदत व्हावी, त्यांना वेळेवर आरोग्याच्या सर्व सुविधा मिळाव्यात यासाठी मनसेचे नेते राजु उंबरकर यांच्या संकल्पनेतून गेल्या १७ वर्षापूर्वी  वणी येथील ग्रामीण रुग्णालया समोर "मनसे रुग्ण सेवा केंद्राची" स्थापना करण्यात आली होती. आज या रुग्ण सेवा केंद्राच्या अध्यक्ष पदी आज हाजी अनिस सलाट यांची नियुक्ती करण्यात आली. वणी मतदारसंघात मनसेत रूग्ण सेवा केंद्र अध्यक्ष हे पद सर्वात बहुमानाचे व मोठे मानल्या जाते. 

वणी मतदारसंघात रूग्ण सेवेची स्थापना करणारा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पहिला पक्ष आहे. आजवर मनसे रुग्ण सेवा केंद्राच्या  माध्यमातून समाजातील हजारो रूग्णांना मदतीचा हात देण्यात आला व त्यांना सर्वतोपरी मदत करण्यात आली. तर अनेकांना जीवदान देण्यात मनसे रूग्ण सेवा केंद्र व त्यांच्या सदस्यांचा मोठा वाटा आहे. अपघात झालेल्या ठिकाणी रुग्ण सेवा केंद्राचे धनंजय त्रिंबके, आजिद शेख, इरफान खान, लक्की सोमकुंवर व त्यांची टीम तात्काळ पोहचत त्यांना रुग्णालया पर्यंत पोहचविण्यात येते. त्याच बरोबर मातेच्या नवजात बाळाच्या जन्माचे स्वागत करत त्यांना आंगड - टोपर देण्यात येते. तर गरोदर मातेसाठी व अन्य रुग्णांना ऑपरेशन वेळी रक्ताची गरज भासल्यास रूग्ण सेवा केंद्राच्या माध्यमातून त्यांना रक्तदाते उपलब्ध करुन देण्यात येतात. गरजू रूग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना रोज जेवणाची, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येते. तर मोठ मोठ्या ऑपरेशनसाठी सर्वतोपरी मदत करण्यात येते. गरोदर मातेसाठी सिजर साठी किंवा ऑपरेशनसाठी मोठ मोठ्या दवाखान्यात पाठविण्यासाठी रुग्णवाहिकेची व्यवस्था तर त्याकाळात आर्थिक मदत भासल्यास ती सुद्धा रुग्णसेवेच्या माध्यमांतून करण्यात येते. येथील ग्रामीण रुग्णालयातील दवाखान्यातील सुविधा सुधाराव्या यासाठी मनसेच्या रुग्णसेवा केंद्राच्या माध्यमातून मोठ मोठी आंदोलने करुन ह्या सुविधा चालू केल्या. यामध्ये एक्स - रे, सिजरची व्यवस्था करण्यात आली.  तर कोव्हिडच्या काळात वणी शहरातील ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाची मान्यता देण्यात यावी, याठिकाणी ट्रामा केयर सेंटर व कोव्हिड सेंटर उभारण्यात यावे यासाठी आमरण उपोषणाचा पावित्रा घेण्यात आला होता, त्या आंदोलनाला यश येत प्रशासनाकडून ह्या मागणी मान्य करण्यात आल्या तर याठिकाणी तात्काळ प्रशस्त व सुसज्ज कोव्हिड सेंटर उभारण्यात आले.

        आज मनसे नेते राजु उंबरकर यांच्या उपस्थितीत या रुग्णसेवा केंद्राच्या अध्यक्ष पदी अनिस सलाट यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी मनसेचे माजी आरोग्य सभापती धनंजय त्रिंबके, वाहतूक सेनेचे राज्य उपाध्यक्ष इरशाद खान, अजिद शेख, इरफान सिद्दिकी, शम्स सिद्दिकी, संकेत पारखी, मयूर गेडाम, शुभम पिंपळकर यांच्या सह मनसे रूग्ण सेवा केंद्राचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad