वनरक्षक पदाच्या भरतीसाठी गेलेल्या तरुणाचा धावत असताना मृत्यू
0
वणी तालुक्यातील पेटूर गावातील सचिन दिलीप लांबट हा तरुण वनविभागाच्या वनरक्षक पदाच्या भरतीसाठी तयारी करीत होता. तो वणीच्या शासकीय मैदानात सरावासाठी नियमित येत होता. ४ मार्च मंगळवारला सचिन भरतीसाठी नागपुरात दाखल झाला. वनरक्षक भरतीची शारीरिक क्षमता चाचणी पाच किलोमीटर अंतर पार करत असताना अवघ्या १० ते १५ मीटर अंतरावर सचिन अचानक पडला तो जागेवरून उठलाच नसल्याची माहिती आहे. त्याची प्रकृती गंभीर झाली. त्याला वनविभागाच्या टीमने नागपुरातील एम्स रुग्णालयात दाखल केले. पण डॉक्टरांनी सचिनला मृत घोषित केले.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या