मारेगाव/प्रतिनिधी : पिक कर्जावर लावलेला ६ टक्के व्याजदर रइ करा, पिक विम्याची रक्कम त्वरीत शेतक-यांना देण्यात यावी, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर ५० हजार अनुदान त्वरीत देण्यात यावे. तसेथ रेतीघाट त्वरीत सुरु करण्यात यावे जेणेकरून घरकूल लाभार्थ्यांना रेती त्वरीत मिळेल. या शेतकऱ्यांच्या प्रमुख समस्याबाबतचे निवेदन यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष तसेच शिवसेना (ठाकरे गट) वणी विधानसभा अध्यक्ष संजय देरकर यांचे नेतृत्वात तहसीलदार मार्फत तालुक्यातील शेतकयांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले.
लाभार्थ्यांना रेती उपलब्ध नसल्यामुळे घरकुलाचे संपूर्ण काम बंद पडलेले आहे. त्यामुळे घरकुल लाभाध्यांचे घरकुलाचे काम पूर्णपणे बंद पडलेले आहे. शेतक-यांकडून शेत पिकावर कोणत्याही प्रकारचे व्याज घेवू नये, शेतकऱ्यांची सरसकट कर्ज माफी करावी व पिक विम्याची रक्कम त्वरीत त्याच्या खात्यात जमा करावे अन्यथा आमरण उपोषण व आंदोलन करण्याचा इशारा तहसीदार मारेगाव मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या निवेदनातुन देण्यात आला आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या