सामाजिक कार्यकर्ते व कापूस पणन महासंघाचे संचालक संजय खाडे यांचा पुणे येथे सामाजिक कार्यातील योगदानासाठी पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. रविवारी दिनांक 03 मार्च रोजी यशदा येथील सभागृहात हा सोहळा संपन्न झाला. पद्मश्री मिलिंद कांबळे यांच्या हस्ते त्यांना सामाजिक क्षेत्रातील योगदानासाठी मानद डॉक्टरेट देऊन गौरव करण्यात आला.
ग्लोबल स्कॉलर फाउंडेशतर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. संजय खाडे हे जय जगन्नाथ मल्टीस्टेट पतसंस्थेचे अध्यक्ष असून गेल्या अनेक वर्षांपासून ते कामगार चळवळ, कृषी चळवळ इत्यादींशी जुळलेले आहेत. त्यांच्या विविध सामाजिक क्षेत्रातील कार्याची दखल घेत त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यांच्या या यशाचे परिसरात कौतुक होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या