क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती महिला मुक्तिदिन म्हणून साजरी केली जाते. मात्र अलीकडच्या काळात स्वातंत्र स्वैराचारात बदलताना दिसत आहे, हा त्या माऊलीचा अपमान नव्हे काय ? महिलांना स्वातंत्र्य मिळावे म्हणून त्या माउलीने किती खस्ता खाल्ल्या.
'खामोशी से जब भर जाओगे, तभी थोडा चीख लेना, वरना मर जाओगे!' स्त्रीमनातील काळानुकाळ झालेली घुसमट दूर करून त्यांना व्यक्त होण्याची संधी दिली, ती पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांनी ! प्रवाहाविरुद्ध जाऊन त्यांनी स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केला आणि स्त्रियांना, मुलींना आत्मनिर्भरतेने जगायला शिकवले. अशा सावित्रीबाई फुले यांचा १० मार्च रोजी स्मृतिदिन आहे.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले सार्व. वाचनालय, विठ्ठलवाडी येथे जगद्गुरु तुकोबाराय आणि सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त आणि ज्यांनी या महाराष्ट्राच्या मातीला एक नव्हे तर दोन- दोन छत्रपती बहाल केले अशा राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ यांच्या प्रतिमेला जिजाऊ ब्रिगेड यांच्या वतीने पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी जिजाऊ ब्रिगेड चे अध्यक्ष, पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या