Type Here to Get Search Results !

अनिकेत चामाटे यांनी जन्मदिनी सावित्रीबाई फुले वाचनालयास महापुरुषांच्या प्रतिमा दिल्या भेट

 वणी, शुभम कडू : 

                                 शहरातील सुप्रसिद्ध क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले सार्वजनिक वाचनालयास प्रहार चे वणी शहराध्यक्ष तथा मारेगाव तालुकाध्यक्ष अनिकेत चामाटे यांनी जन्मदिनाचे औचित्य साधत संत रविदास महाराज व  संत जगनाडे महाराज या महापुरुषांच्या प्रतिमा भेट दिल्या. 

     शत्रू ही मरताना त्याचं कौतुक करून गेला
        असा वाघाचा छावा संभाजी
     सह्याद्रीचा दुसरा छत्रपती राजा होऊन गेला!
     धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान       
      दिनानिमित्त वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. बाळासाहेब राजूरकर यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. 
ग्रंथामुळेच आधुनिक भारताची निर्मिती झाली आहे. केवळ शिक्षण क्षेत्रच नाही तर सर्वच क्षेत्रातील लोकांनी ग्रंथाचे वाचन करणे आवश्यक आहे. वाचन संस्कृती जोपासण्यासाठी वाचन गरजेचे आहे. वाचन संस्कृती टिकविणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन अनिकेत चामाटे यांनी मनोगत व्यक्त करताना केले.
यावेळी प्रा. बाळासाहेब राजूरकर यांनी महापुरुषांच्या प्रतिमा भेट दिल्याबद्दल अनिकेत चामाटे यांचे अभिनंदन करून पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.  
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. बाळासाहेब राजूरकर, प्रमुख पाहुणे संचालक अनिलकुमार टोंगे आणि प्रभाकरराव मोहितकर होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक चौधरी, प्रास्ताविक नामदेवराव जेनेकर, उपस्थितांचे आभार संचालक सुरेश राजूरकर यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रंथपाल शुभम कडू, सहाय्यक प्रज्वल गोहोकार, गौरव ताटकोंडावार यांनी विशेष प्रयत्न केले. यावेळी वाचनालयातील वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

IMG-20260924-WA0016