Type Here to Get Search Results !

सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांंचा "सर्वोत्कृष्ट विद्यार्थी" सन्मान देऊन गौरव

 मारेगाव : विद्येची आराध्य दैवत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून आज जि.प. उच्च प्राथमिक शाळा, चिंचाळा ता. मारेगाव येथे स्मृतिशेष स्व. ताराबाई ढोणे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ श्री विनोद ढोणे सर यांचे तर्फे सन 2023-24 या शैक्षणिक सत्रातील सहा क्षेत्रात ( प्रश्नमंजुषा, वक्तृत्व,  कला व सांस्कृतिक, खेळ व क्रीडा, नम्र व शिस्तप्रिय, अष्टपैलू) सर्वोत्कृष्ट  कामगिरी करणार्‍या सहा विद्यार्थ्यांंना "सर्वोत्कृष्ट विद्यार्थी" हा सन्मान देऊन गौरविण्यात आले.                                 

          कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  जि.प. उच्च प्राथमिक शाळा, चिंचाळा येथील मुख्याध्यापक सन्माननीय श्री. गायकवाड सर तर प्रमुख अतिथी वरुड केंद्राचे केंद्रप्रमुख सन्माननीय श्री. ढवस सर, तर प्रमुख पाहुणे म्हणून सन्माननीय श्री.देवाळकर सर, श्री. इंगोले सर, श्री. ढोणे सर उपस्थित होते.                                                   

प्रसंगी सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्यांना अध्यक्ष व मान्यवरांतर्फे सन्मानचिन्ह व शालेयपयोगी वस्तू देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad