वणी विधानसभा क्षेत्रातील खंबीर नेतृत्व म्हणून संजय देरकर यांच्याकडे पाहिल्या जाते. अनेक वेळा विधानसभा लढण्याचा अनुभव पाहता, लोकांशी दांडगा संपर्क ठेवून वेळोवेळी समाजातील वंचित शोषित घटकांना न्याय मिळवून देण्याचे काम संजय देरकर यांच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून होत आहे.
अशातच गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे ) या पक्षात जाहीर प्रवेश केला होता त्यानंतर त्यांच्यावर दि.२७ फेब्रुवारी २०२४ रोजी पक्ष नेतृत्वाने वणी विधानसभा प्रमुख पदाची जबाबदारी सोपवली. या नियुक्तीमुळे शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) गटात उत्साह संचारला असून आज दि. ०२ मार्च ला वणी विधानसभा प्रमुख संजय देरकर यांच्या नेतृत्वात पदाधिकारी व कार्यकर्तासह बाईक रॅली काढण्यात आली. सर्व प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला व हिंदूहृदयसम्राट बाळासाहेबांना हार्रापण करून मानवंदना देण्यात आली.
यावेळी अनेक युवकांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये संजय देरकर यांच्या नेतृत्वात शिवबंधन बांधून जाहीर पक्षप्रवेश करण्यात आला. या रॅलीमध्ये शिवसैनिक पदाधिकाऱ्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण होते. जय भवानी जय शिवाजी च्या जयघोषाने वणी शहर दुमदुमले होते.
यावेळी वणी विधानसभा प्रमुख संजय देरकर, कामगार नेते अविनाश भुजबळराव, दिपक कोकास, सुधीर थेरे, युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे, युवासेना जिल्हा समन्वयक समिर लेनगुरे, संजय देठे, भगवान मोहीते, जगन जुनगरी, मनिष बतरा, अजय चन्ने, चेतन उलमाले, प्रशांत बलकी, चैतन्य टोंगे, अमित घुरकट, कस्तुब येरणे, प्रतिक काकडे, अवि काकडे यांच्या सह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.
शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) गटात युवकांचा पक्ष प्रवेश
वणी विधानसभा प्रमुख पदी संजय देरकर यांची निवड झाल्याने युवा कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारल्याचे दिसून येत आहे. आज शनिवारी झालेल्या बाइक रॅली दरम्यान वणी विधानसभा क्षेत्रातील युवकांचा भव्य पक्षप्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी मयुर खांडरे, विजयसिंग, आकाश गौतम, ओम पेंदोर, मंगेश मडावी, निशीकांत खोकले, राकेश वरारकर, निलेश सातपुते यांच्या सह असंख्य युवकांनी शिवबंधन बांधून शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) गटात पक्षप्रवेश केला.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या