Type Here to Get Search Results !

स्माईल फाउंडेशनच्या उन्हाळी शिबिरात 150 विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण

वणी, शुभम कडू :  

                          स्माईल फाउंडेशन दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ‘स्पोकन इंग्लिश’ अर्थात इंग्रजी संभाषणाचे उन्हाळी शिबिर घेत आहे. या शिबिरात दिव्यांग, अनाथ, आर्थिकदृष्ट्या असमर्थ अशा 150 विद्यार्थ्यांना या शिबिरात मोफत प्रवेश दिला जाईल. इतरांकरिता नाममात्र शुल्क आकारण्यात येईल. 3  मार्चपासून या शिबिरात प्रवेश घेण्यासाठी नोंदणी होईल. ही नोंदणी एस. पी. शाळेजवळील वॉटर सप्लाय कार्यालयात संस्थेचे अध्यक्ष सागर जाधव यांच्याकडे सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत करता येईल. हे शिबिर 1 ते 31 मे दरम्यान जनता शाळेजवळील गुरूनगर येथील हनुमानमंदिर जवळ होईल. शिबिरार्थी 7038204209 या मोबाईल नंबरवरदेखील नोंदणी करता येईल.

हे शिबिर इयत्ता 4 थी ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी राहील. नोंदणी करताना एक पासपोर्ट साईज फोटोसह फॉर्म भरणे आवश्यक आहे. याची अंतिम तारीख 25 एप्रिल 2024 ही राहील. या शिबिरात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बेसीक इंग्लीश म्हणजेच पायाभूत इंग्रजीवर भर दिला जाईल. व्यक्तिमत्व विकासाचं नवं तंत्र या शिबिरातून विद्यार्थ्यांना मिळेल. नेतृत्वगुणांचा विकास व्हावा म्हणून तज्ज्ञ मार्गदर्शन करतील. आरोग्यम् धनसंपदा या सत्रात आरोग्याची काळजी कशी घ्यावी हे तज्ज्ञ सांगतील. वक्तृत्वकला तथा संभाषण कौशल्य, वाचनकौशल्य यावर त्या त्या क्षेत्रांतील एक्सपर्ट्स प्रशिक्षण देतील. 

शिबिरार्थ्यांना हसतखेळत हे प्रशिक्षण पूर्ण करता यावं म्हणून जोडीला अनेक उपक्रम राहतील. यात शिबिरार्थ्यांसाठी सहल होईल. संपूर्ण शिबिरार्थ्यांसह सिनेमा पाहिला जाईल. स्विमिंग आणि अन्य इनडोअर आऊटडोअर गेम्स होतील. प्रतिभावंताच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून नृत्य, अभिनय आदी कलाप्रकारांचं सादरीरकण होईल. सामाजिक कार्यकर्ते तथा उदार दानदाते विजयबाबू चोरडिया, महाराष्टृ राज्य पणण महासंघाचे संचालक संजय खाडे आणि प्रसिद्ध उद्योेजक किरण दिकुंडवार, तुषार नगरवाला, सचिन दुमोरे, हितेश मेहता, डाॅ. अनिकेत अलोणे, मनीष कोंडावार, डाॅ. आशुतोष जाधव, रमेश तामगाडगे, रवी रेभे, राजू पिंपळकर, मनीष बुरडकर, प्रसाद पिपराडे, दत्तात्रेय पुलेनवार यांनी या शिबिरातल्या अनेक जबाबदाऱ्या उचलल्यात.

तेव्हा लवकरात लवकर आपल्या नावाची नोंदणी सायंकाळी 5 ते 7 या वेळेतच संस्थापक अध्यक्ष प्रा. सागर जाधव यांच्याकडे करावी. या शिबिराच्या यशासाठी अध्यक्ष सागर जाधव, उपाध्यक्ष पीयुष आत्राम सचिव आदर्श दाढे, विश्‍वास सुंदरानी, उत्कर्ष धांडे, खुशाल मांढरे, कुणाल आत्राम, सचिन जाधव, तन्मय कापसे , अनिकेत वासरीकर, घनश्याम हेपट, मयूर भरटकर, राज भरटकर, कार्तिक पिदुरकर, विष्णू घोगरे हे सदस्य कार्यरत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad