Type Here to Get Search Results !

लायन्स इंग्लिश मिडी. स्कूल वणी ला इंटरनॅशनल अवार्ड

इंटरनॅशनल अवार्ड स्विकारतांना लायन राजाभाऊ पाथ्रडकर, शमीम अहमद, किशन चौधरी व बलदेव खुंगर


   लायन्स क्लब वणी द्वारा    संचालित 'लायन्स इंग्लिश मिडीयम हायस्कूल,ज्युनिअर व सिनियर कालेज' ला लायन्स इंटरनॅशनल चा 'उत्कृष्ट शाळा' म्हणून इंटरनॅशनल अवार्ड देवून गौरविण्यात आले.

नागपूर, येथील हाँटेल प्राईड येथे आयोजित कार्यक्रमात इंटरनॅशनल चे माजी डायरेक्टर लायन नवलजी मालू, मल्टिपल डायरेक्टर लायन विनोदजी वर्मा, डीस्ट्रीक गव्हर्नर लायन बलविरसिंग विज, सेकंड व्हॉईस डिस्ट्रीक गव्हर्नर लायन भरत बलगट व माजी डीस्ट्रीक गव्हर्नर लायन विनोदजी जैन यांचे हस्ते, अत्यंत प्रतिष्ठेचा 'इंटरनॅशनल अवार्ड' लायन राजाभाऊ पाथ्रडकर अध्यक्ष लायन्स क्लब वणी, लायन बलदेव खुंगर उपाध्यक्ष लायन्स चॅरिटेबल ट्रस्ट, लायन किशन चौधरी सचिव लायन्स क्लब वणी व वणी लायन्स चॅरिटेबल ट्रस्टचे माजी अध्यक्ष लायन शमीम अहमद यांना प्रदान  करण्यात आला 

       वणी विभागातील इंग्रजी माध्यमाची पहिली शाळा म्हणून ओळख असलेल्या या शाळेची ई.स.१९७५ मध्ये देशमुखवाडी येथे,'लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल' या नावाने सुरवात करण्यात आली. सुरुवातीला पूर्व प्राथमिक चे वर्गअसलेली शाळा, कालौघात शैक्षणिक प्रगतीचे अनेक टप्पे गाठत नावारूपास आली.आज शाळेत पूर्व प्राथमिक, प्राथमिक व उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक तसेच डिग्री कालेज असे विभागअसून सुरुवातीला भाड्याच्या इमारतीत सुरू झालेली शाळा आज शहरातील तिन स्वतंत्र मालकीच्या इमारतीत भरते.तसेच नर्सरी ते बी.एस.सी.पदवी पर्यंतच्या अभ्यासक्रमाचे, 2200 विद्यार्थ्यांना शिक्षण देणारी एकमेव शाळा म्हणून लौकिकास आली आहे.

             वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री संजीव रेड्डी बोदकुरवार, लायन्स चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त व विद्यमान अध्यक्ष असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक सामाजिक संस्था व गरजूंना मदत करण्याचे कार्य अव्याहतपणे सुरू आहे.

' लायन्स क्लब वणी 'या सेवाभावी संस्थेने सामाजिक बांधिलकीतून सुरू केलेल्या गुणवत्तापूर्ण,निरंतर व निस्वार्थ शैक्षणिक कार्याची दखल लायन्स इंटरनॅशनल द्वारा घेण्यात आली. यथोचित सन्मान करण्यासाठी प्रतिष्ठेचा  'इंटरनॅशनल अवार्ड' पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

        याबद्दल सर्व स्तरांतून, मान्यवरांनी लायन्स क्लब वणी चे अभिनंदन व कौतुक केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad