Type Here to Get Search Results !

लायन्स स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात किशोरवयीन विद्यार्थीनीसाठी समुपदेशन सत्राचे आयोजन

वणी, शुभम कडू :
                          येथील लायन्स इंग्लिश मिडीयम हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात किशोरवयीन विद्यार्थीनी साठी "मासिकपाळी व्यवस्थापन" बाबत (Menstrual Hygiene Work Shop) समुपदेशन सत्राचे आयोजन करण्यात आले.
             समुपदेशन सत्राच्या अध्यक्षस्थानी लायन्स क्लब वणीचे अध्यक्ष लायन राजाभाऊ पाथ्रडकर, वणी येथील शांतीलाल मॅर्टनिटी हास्पिटलच्या संचालिका डॉ संचिता नगराळे प्रमुख वक्त्या व मार्गदर्शिका म्हणून उपस्थित होत्या, तर शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रशांत गोडे, वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या दिपासिह परिहार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

        मार्गदर्शन व समुपदेशन करतांना डॉ संचिता नगराळे यांनी विद्यार्थ्यांनीशी संवाद साधत प्रश्नोत्तराच्या माध्यमातून मासिक पाळी चे व्यवस्थापन करतांना घ्यावयाची काळजी व योग्य आहार तसेच किशोरवयीन मुलींना आरोग्याबाबत भेडसावणाऱ्या समस्या कशा दूर करता येतील याबाबत सखोल मार्गदर्शन केले.यावेळी सौ. चित्रा देशपांडे यांनी मनोगत व्यक्त केले.मार्गदर्शनसत्रा नंतर डॉ संचिता नगराळे यांना पाहुण्यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देण्यात आले.

   या समुपदेशन सत्राचे संचालन सौ.मनिषा ठाकरे यांनी केले तर प्रिती निकुरे हिने आभार मानले. इयत्ता सहावी ते बारावी तसेच वरिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad