वणी / प्रतिनिधी : कुरई या गावातील महाविद्यालयीन मुलीने शेजारच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पायल श्रीराम गेडाम (१८) असे गळफास घेतलेल्या मुलीचे नाव आहे. शेजाऱ्याच्या घरातील टिनाच्या छताला असलेल्या लोखंडी अँगलला नारळी दोरीने लटकलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळून आला. ही घटना दि. ०४ फेब्रुवारीला दुपारी २ वाजताच्या सुमारास कुरई या गावात घडली.
पायल चे वडील घटनेच्या दिवशी शेतमजुरी करून दुपारी घरी परतले असतात, त्यांना पायल घरी दिसली नाही. त्यामुळे त्यांनी गावात शोध घेतला असता त्यांना ती कुठे दिसली नाही. शेवटी घराशेजारी बघितले असता शेजारच्या घरात गळफास लागलेल्या अवस्थेत आढळली. त्यांनी लगेच तिला ग्रामीण रुग्णालय वणी येथे आणले. परंतु डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. पायल ने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप कळू शकले नाही. पुढील तपास वणी पोलीस करीत आहे.
👉 वणी : सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी हा नेहमी उपाशीच असतो 👇👇
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या